आरोग्यासाठी अनेक जण गाईचं दूध पितात. पण तुम्हाला माहित आहे की गाई आणि म्हशीच्या दूधापेक्षा बकरीचं दूध (Goat Milk) आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असते. यामुळे तुमचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होते. बकरीच्या दुधात (Goat Milk) मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते ते आपल्या हृदयासाठी फायदेशीर ठरु शकते.
कोलेस्ट्रोलचे प्रमाण योग्य राखण्यास देखील बकरीचे दूध अधिक फायदेशीर असते. बकरीच्या दुधात अनेक गुणधर्म असतात. त्यामुळे तुमच्या शरीरासाठी अनेक फायदे मिळण्यास मदत होते.बकरीचे दूध पचण्यास हलके असते. कारण गाईच्या दूधात असणाऱ्या प्रथिन्यांपेक्षा बकरीच्या दूधामध्ये असलेले प्रथिने लवकर पचतात. हे दूध लहान मुलांसाठीदेखील अधिक फायदेशीर असते.
बकरीचे दूध हाडांसाठी उपयुक्त ठरु शकते. यामध्ये कॅल्शियम चांगल्या प्रमाणात असते. लॅक्टोज चे प्रमाण बकरीच्या दुधात कमी प्रमाणात असते. तर गायीच्या दूधामध्ये याचे प्रमाण खूप असते. बकरीच्या दूधामध्ये व्हिटॅमिन ए चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मोतीबिंदूचा धोका कमी होण्यास याची मदत होते.