पुणे : थैमान घालणाऱ्या पावसानं (Rain Update) आता काहीशी विश्रांती घेतल्यामुळं अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. जुलै महिन्यात या पावसाने अक्षरशः थैमान घातले होते. मात्र या पावसाने (Rain Update) आता ऑगस्टच्या सुरुवातीस दडी मारली आहे. किंबहुना येते काही दिवस राज्यातील ठराविक भाग वगळता पर्जन्यमान तुरळक असेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांसाठी राज्याच्या कोणत्याही जिल्ह्यांना रेड अथवा ऑरेंज अलर्टही देण्यात आलेला नाही. मात्र काही जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस
देशात जुलै महिन्यात सरासरीहून 13 टक्के जास्त पाऊस झाला. परंतू येत्या दिवसांमध्ये म्हणजेच मान्सूनला पोषक स्थिती नसल्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये मात्र सरासरीहून काही अंशी कमी म्हणजेच 92 टक्के पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
शेतीला बसणार फटका
कमी पर्जन्यमानाचा (Rain Update) फटका शेतकामांवर होताना दिसणार आहे. ज्यामुळं शेतकऱ्यांपुढं नवी आव्हानं उभी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.