टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर बॅट्समन इशान किशन (Ishan Kishan) याने वैयक्तिक कारणामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA Test) आगामी कसोटी मालिकेतून माघार घेत असल्याची विनंती बीसीसीआयला केली. त्यानंतर इशान किशनचं नाव कसोटी संघातून काढून घेण्यात आलं आहे. त्यामुळे आता इशानच्या जागी केएस भरतची संघात एन्ट्री झाली आहे. इशान किशनच्या रूपाने टीम इंडियाला हा तिसरा धक्का मानला जात आहे.
🚨 UPDATE 🚨: Ishan Kishan withdrawn from #TeamIndia’s Test squad. KS Bharat named as replacement. #SAvIND
Details 🔽https://t.co/KqldTEeD0T
— BCCI (@BCCI) December 17, 2023
इशान किशनच्या आधी टीम इंडियाचे दोन खेळाडू मालिकेतून बाहेर झाले आहेत. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर वनडे मालिकेतून बाहेर झाला आहे, तर मोहम्मद शमी हा टेस्ट मालिकेतून बाहेर झाला आहे. टीम इंडियासोबत कसोटी मालिकेवेळी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप असतील.
कसोटीसाठी भारताचा संघ
रोहित शर्मा (C), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (WK), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (VC), प्रसीद्ध कृष्णा, केएस भरत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Chandrakant Patil : भाजपाचे पद म्हणजे जबाबदारी आणि अपेक्षा! – नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन
Ranbir Kapoor : ‘ॲनिमल’च्या पुढच्या भागात ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत रोमान्स करणार रणबीर कपूर
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी केल्या ‘या’ 10 प्रमुख मागण्या
Viral Video : खोपोलीत बसमध्ये महिला वाहक आणि प्रवाशामध्ये फ्री स्टाईल हाणामारी
Sajjan Jindal: JSW समूहाचे एमडी सज्जन जिंदाल यांच्यावर बलात्काराचा आरोप
Nagpur News : नागपुरमधील सोलर कंपनीत भीषण स्फोट; 9 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू
Parbhani News : देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; 3 भाविकांचा मृत्यू
Accident News : भरधाव ट्रक दुकानांत घुसल्याने भीषण अपघात; 3 ठार