AUS vs PAK

AUS vs PAK : ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्यामुळे सामन्यादरम्यान मैदानात राडा; पोलीस आले आणि…

1091 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 20 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरूद्ध पाकिस्तान (AUS vs PAK) यांच्यामध्ये सामना रंगला होता. बंगळूरूच्या चिन्नस्वामी स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जात होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या टीमने पाकिस्तानचा 62 रन्सने पराभव केला. मात्र या सामन्यादरम्यान एक मोठा राडा पाहायला मिळाला. बेंगळुरूमध्ये खेळल्या गेलेल्या पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात एका चाहत्याने पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्यामूळे हा वाद झाला.

काय घडले नेमके?
पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना सुरु असताना पाकिस्तानी चाहत्यांना पाक टीमला सपोर्ट करण्यापासून रोखण्यात आलं. स्टेडियममध्ये तैनात असलेल्या पोलिसांनी पाकिस्तानी चाहत्यांना स्पष्टपणं सांगितलं की, स्टेडियममध्ये पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देता येणार नाही. यावरून स्टेडियममध्ये गोंधळ तर झालाच पण आता सोशल मीडियावरही यावरून वाद निर्माण झाला आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानची जर्सी घातलेला एक व्यक्ती पोलीस अधिकाऱ्याशी वाद घालताना दिसतोय. यामध्ये तो चाहता म्हणाला, ‘मी पाकिस्तानचा आहे. मी ‘पाकिस्तान झिंदाबाद’ नाही म्हणणार तर काय बोलणार?’ तसेच तो पुढे बोलताना म्हणतो कि ज्यावेळी लोक ‘भारत माता की जय’च्या घोषणा देतात, तर मग मी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा का देऊ शकत नाहीत.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ समोर येताच पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी यावरून संताप व्यक्त केला आहे. भारतातील पाकिस्तानी चाहत्यांना त्यांच्याच टीमना सपोर्ट करता येत नसल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. काही भारतीय क्रिकेट चाहत्यांनी देखील पोलिसांची ही वृत्ती चुकीची असल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे आता या व्हिडिओवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Share This News

Related Post

Pune News

Pune News : मराठी जपावी, रुजवावी! सोशल मीडियाच्या जगात मनसे चित्रपटसेनेकडून राज्यस्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन

Posted by - February 27, 2024 0
पुणे : सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात आणि कंम्प्युटरच्या जगात (Pune News ) सुंदर अक्षरच नाही तर लेखनाचाही आपल्याला विसर पडला…

मुंबई : आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले महत्वाचे निर्णय (Video)

Posted by - July 14, 2022 0
मुंबई : आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आले. आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की , थेट लोकांशी…
Karisma Kapoor

Karisma Kapoor : 27 वर्षांनंतर करिश्मा कपूरने सांगितला ‘त्या’ किसिंगसीन मागचा ‘तो’ किस्सा

Posted by - July 21, 2023 0
मुंबई : ‘राजा हिंदुस्तानी’ हा 90 च्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक मानला जातो. हा चित्रपट जबरस्त गाणी, अफलातून अभिनय आणि…

#VIRAL VIDEO : लग्नाच्या मंडपात नवरदेवाने केले असे कृत्य, व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरता येणार नाही

Posted by - March 27, 2023 0
व्हायरल व्हिडिओ : सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. यासाठी सोशल मीडियावर दररोज लग्नाशी संबंधित व्हिडिओ शेअर केले जात आहेत. त्यातील…

उत्तर प्रदेशात भाजप सुसाट!उत्तर प्रदेशच्या विजयावर भाजपाचा पुण्यात जल्लोष 

Posted by - March 10, 2022 0
उत्तर प्रदेशसह देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपैकी 4 ठिकाणी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *