अलीकडच्या काळात व्हॉट्सॲपने अनेक फीचर्स लॉन्च केले आहेत. आता या ॲपने पुढचे पाऊल टाकत एक नवे फिचर युजर्ससाठी आणले आहे.
ग्लोबल व्हॉइस प्लेयर फिचर असे याचे नाव असून मागील बीटा अपडेटमध्ये हे फिचर दिसून आले आहे. तसेच व्हॉट्स ॲप डेस्कटॉपवर ही टेस्टिंग करण्यात आले आहे. विशेष म्हणजे काही अँड्रॉइड साठी ते उपलब्धही करून देण्यात आले आहे.
या फिचरच्या माध्यमातून वेगवेगळ्या साइट्सवर मेसेज करणे आणि व्हॉईस नोट ऐकणे या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करता येणार आहेत. कितीही मोठी व्हॉईस नोट असली तरी आता युजरला दुसऱ्या चॅट वरील मेसेजला उत्तर देताना व्हॉईस नोट ऐकता येणार आहे.
सध्या या ॲपवर कोणत्याही स्वरूपाची व्हॉईस नोट ऐकत असताना युजर त्या चॅट मधून बाहेर पडला की व्हॉईस नोट बंद होते. ही नोट पुन्हा ऐकण्यासाठी त्याला त्यावर परत जावे लागते. आता मात्र नव्या फिचर मुळे हा त्रास वाचणार आहे.