पूर्ववैमनस्यातून पुण्यात 21 वर्ष तरूणाची हत्या

580 0

पुर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून चोघांनी मिळून 21 वर्षीय तरूणावर कोयत्यानं वार करून खून  केल्याची घटना बिबवेवाडीतील सुपर इंदिरानगरमधील  सुवर्णयुग मित्र मंडळाजवळ घडली.

याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरूणाला खून केल्यानंतर आरोपींनी त्यांच्याजवळील कोयते हवेत फिरवून शिवीगाळ करत जर कोणी काही बोललात तर याद राखा असे जोरजोरात ओडवून परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

योगेश रामचंद्र पवार (21, रा. सुवर्णयुग मित्र मंडळ जवळ, सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. दरम्यान, योगेशचा मित्र वैभव सोमनाथ घाटूळ (22, रा. टिळेकर नगर, कात्रज-कोंढवा रोड,  याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विश्वास शिंदे, नागेश फुलारे, सनि भोंडेकर, ओंकार खाटपे यांच्याविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की योगेश पवार, वैभव घाटूळ आणि गणराज ठाकर हे फिर्यादीच्या मोटारसायकलवरून योगेशच्या घरी जात होते. ते सुपर इंदिरानगर येथे आले असता आरोपींनी पुर्वी झालेल्या भांडणावरून योगेशच्या दिशेने रंग फेकला. योगेशने गाडी थांबवून त्यांना जाब विचारला असता आरोपींनी त्यांच्याकडील कोयत्यांनी त्याच्यावर सपासप वार केले. दरम्यान, काही क्षणातच योगेश रक्ताच्या थारोळयात जमिनीवर पडला

त्याला तात्काळ ससून रूग्णालयात  नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!