आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सत्यजित कदम यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सत्यजित कदम यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.
तसेच राहुल चिकोडे, धनंजय महाडिक आणि महेश जाधव यांच्यावर पोटनिवणुकीसाठी विशेष जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती देखील चंद्रकांत पाटील यांनी दिली.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्या वतीने श्री. सत्यजित कदम यांना अधिकृत उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
तसेच श्री. राहुल चिकोडे, श्री. धनंजय महाडिक आणि श्री. महेश जाधव यांच्यावर पोटनिवणुकीसाठी विशेष जबाबदारी देण्यात आली असून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा !💐 pic.twitter.com/OkfTsJzoNJ
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 19, 2022