रश्मी ठाकरेंचे भाऊ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या कारवाईत पाटणकर यांचे 11 फ्लॅट्स जप्त झाले आहेत.
या फ्लॅट्सची किंमत 6 कोटी 45 लाख रुपये इतकी आहे असं ईडीने सांगितले आहे.
शिवसेनेनी या कारवाईचा निषेध केला आहे. ही कारवाई केवळ राजकीय सूडबुद्धीतून करण्यात आल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. रश्मी ठाकरेंचे भाऊ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे.
सक्तवसुली संचालनालयाने केलेल्या कारवाईत पाटणकर यांचे 11 फ्लॅट्स जप्त झाले आहेत. या फ्लॅट्सची किंमत 6 कोटी 45 लाख रुपये इतकी आहे असं ईडीने सांगितले आहे.
नेमके प्रकरण काय आहे ?
6 मार्च 2017 रोजी PMLA कायद्याअंतर्गत पुष्पक ग्रुपविरोधात ईडीनं गुन्हा दाखल केला होता.
अंमलबजावणी संचलनालया (ED) ने श्रीधर माधव पाटणकरांवरील कारवाईबाबत पत्रक काढून माहिती दिलीय.
ईडीच्या माहितीनुसार, पुष्पक ग्रुपची 6.45 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आलीय. यात ठाण्यातील निलांबरी प्रकल्पातील 11 रहिवासी फ्लॅट्सचा समावेश आहे.
निलांबरी प्रकल्प श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीचे असून, याचे मालक श्रीधर माधव पाटणकर हे आहेत.
व्यवहार कसे झाले?
ईडीने म्हटले आहे की आज, अंमलबजावणी संचालनालयाने पुष्पक बुलियन या कंपनीची 6.45 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. ही कंपनी पुष्पक समूहांच्या कंपन्यांपैकी एक आहे. या कारवाई अंतर्गत एकूण 11 फ्लॅट जप्त करण्यात आले आहेत. हे फ्लॅट्स निलांबरी प्रकल्प, ठाणेच्या अंतर्गत येतात. हा प्रकल्प श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लिमिटेड यांचा आहे. ही कंपनी श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीची आहे.
6 मार्च 2017 रोजी ईडीने पुष्पक बुलियन आणि ग्रुप ऑफ कंपनीज विरोधात PML Act 2002 मध्ये केस दाखल करण्यात आली होती. आणि याआधीच महेश पटेल, चंद्रकांत पटेल संचलित पुष्पक बुलियनची 21 कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त केली आहे.
त्यानंतर करण्यात आलेल्या तपासात हे समजले आहे की महेश पटेल यांनी नंदकिशोर चतुर्वेदींनी पुष्पक समूहातील पुष्पक रिअॅलिटी या कंपनीचा निधी वळवला. पुष्पक रिअलिटीने एका व्यवहारासाठी विविध स्तरांचा वापर करून 20.02 कोटी रुपयांचा निधी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्याकडे वळवला.
नंदकिशोर चतुर्वेदी हे अनेक शेल कंपन्या चालवतात. त्यांच्या कंपन्यांपैकी एक कंपनी हमसफर डीलर प्रायव्हेट लिमिटेड मार्फत व्यवहार करण्यात आले. यामार्फत श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडला 30 कोटींचे कर्ज कुठलेही तारण न ठेवता देण्यात आले. म्हणजेच महेश पटेलयांचे पैसे नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मार्फत श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गुंतवण्यात आले.