भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशन प्रकरणात चव्हाण यांच्या चौकशीची या लेखी तक्रारमध्ये मागणी केली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी महाजन यांचा लेखी अर्ज सीआयडीकडे दिला आहे.
विशेष सरकारी वकील हे सरकार भाजपचे आमदार गिरीश महाजन आणि विरोधकांना विविध प्रकरणात गोवण्यासाठी षडयंत्र रचत असल्याचा गंभीर आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत व्हिडिओ बॉम्ब टाकला.
यात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनचा समावेश आहे. फडणवीसांच्या या आरोपानंतर तत्कालीन विशेष सरकारी वकील यांनी त्यांचे हे आरोप फेटाळून लावले आहे.
तर या प्रकरणात स्टिंग ऑप्रेशन करणाऱ्या तेजस मोरे विरोधात प्रवीण चव्हाण यांनी तक्रार दाखल केलेली आहे. तसेच हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी फडणवीसांनी केली होती.
पण हे प्रकरण सीबीआय ऐवजी सीआयडीकडे देण्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशन प्रकरणात चव्हाण यांच्या चौकशीची मागणी गिरीश महाजन यांनी केली आहे.