सीएनजी, हायड्रोजन, जैवइंधन आदींवर चालणाऱ्या वाहनांचे राष्ट्रीय प्रदर्शन पुणेकरांना येत्या दोन ते पाच एप्रिल दरम्यान पाहायला मिळणार आहे. त्यात बहुराष्ट्रीय – राष्ट्रीय कंपन्या सहभागी होणार आहेत. तसेच इंधनांच्या विविध प्रकारांवर तज्ञांचे मार्गदर्शन ही मिळणार आहे.
यानिमित्त शहरातील तीस किलोमीटरची इलेक्ट्रिक वाहनांची रॅली ही काढण्यात येणार आहे. टाटा मोटर्स, पियागो, स्कोडा ऑटो, महिंद्रा ग्रुप, कल्याणी, केपीआयटी, प्राज इंडस्ट्रीज आधी अनेक कंपन्यांचा या प्रदर्शनात सहभाग असेल.
प्रदर्शनाबाबतचे तपशील एमसीसीआयए च्या संकेतस्थळावर मिळतील. शहराच्या वेगवेगळ्या भागातून 3 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ही वाहनांची रॅली निघेल. ज्या नागरिकांकडे ही वाहने आहेत त्यांनाही त्यात सहभागी होता येणार असून सुमारे 30 किलोमीटरची ही रॅली असणार असल्याची माहिती संयोजकांतर्फे देण्यात आली.