उन्हाच्या तीव्र झळांचा अनुभव घेत असलेल्या पुणेकरांना रविवारी मात्र काहीसा दिलासा मिळाला. उष्णता जरी जास्त असली तरी अंशतः ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात काहीशी घट झाली होती, परंतु किमान तापमानात सरासरीपेक्षा तब्बल पाच अंशांनी वाढ झाली होती. परिणामी उकाड्यात झपाट्याने वाढ झाली होती.
पुढील तीन ते चार दिवस शहर आणि परिसरात अधून-मधून अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. पुणेकरांना यंदा मे महिन्यासारखी अनुभूती मार्च महिन्यातच होत आहे. उन्हाच्या झळा तापदायक आहेतच, त्यात उकाड्यामुळे घामाच्या धारा देखील वाढल्या आहेत. तसेच दुपारच्या वेळी घराबाहेर पडावे की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.