Women's day special ममता सपकाळ

Womens day special :ममता सिंधुताई सपकाळ यांच्याशी खास संवाद

260 0

‘Womens’ day special: सिंधुताई सपकाळ हे केवळ एक नाव नसून अनाथांच्या वंचितांच्या उपेक्षितांच्या जगण्यासाठी नवीन उमेद देणारा एक ऊर्जा स्त्रोत होता. सिंधुताईंचा प्रवास हा सर्व महाराष्ट्राला परिचित आहे. त्या ताई पासून अनाथ व गरजू मुलांच्या माई कशा बनल्या हे सर्वांना सांगण्याची गरज नाही. अतिशय खडतर व कष्टदायक परिस्थितीतून त्यांनी त्यांच्या आयुष्याची सुरुवात केली त्यांच्यावर आलेल्या प्रसंगातून अनुभव घेऊन, त्यांनी इतर अनाथ मुलांसाठी त्यांची आई बनण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांच्या हातात त्यांच्या पोटची पोर म्हणजेच ममता सपकाळ याही होत्या त्यांच्यासोबतच इतर गरजू व अनाथ मुलांचे संगोपन व शिक्षण याची धुरा सिंधुताई सपकाळ यांनी सांभाळली.आता सिंधुताई ची लेक ममता सपकाळ (Mamata Sapkal Sindhutai Sapkal’s daughter) या सर्व संस्था सांभाळतात त्यांच्या प्रवासाबद्दल काही अनुभव त्यांनी या माध्यमातून मांडले.

‘Womens’ day special

•ममता सिंधुताई सपकाळ यांचा कसा राहिला प्रवास?

ममता यांच्या लहानपणीच्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना राहावे लागले. बारा वर्षे त्या पुण्यामध्ये होत्या सेवासदन येथे त्यांच ग्रॅज्युएशन पूर्ण झाले. गरवारे मध्ये सायकॉलॉजी डिग्री पूर्ण केली व त्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च ग्रॅज्युएशन पर्यंत पुणे दगडूशेठ हलवाई ट्रस्ट यांच्याकडून करण्यात आला.यादरम्यान ममता त्यांच्या आई पासून शिक्षणाच्या कारणानिमित्त वेगळ्या राहत असत पण त्यांनी सांगितले की या कारणामुळे कधी मला माईची माया कमी भासली नाही आम्ही दूर असत त्या कारणाने जास्ती भेटीगाठी होत नसत पण तिच्या प्रेमाची मला कधीच कधीच कमी जाणवत नसे. सिंधुताई सपकाळ या जाण्याअगोदर दीड महिने त्यांच्या लेकीकडे वास्तव्यास होत्या त्यादरम्यान इतक्या वर्षांची कमी माझ्या आईने भरून काढल्याचे ममता यांनी सांगितले. सिंधुताईंच्या निधनानंतर या सर्व संस्था व अनाथ आश्रम आता ममता व सिंधुताईंच्या मुलांच्या देखरेखी खाली चालतात.

•ममता सपकाळ सिंधुताईंचा कसा चालवतायेत वारसा ?

ममता ताईंनी सांगितले की हा वसा आम्ही सर्व मिळून संभाळत आहोत. दीपक सासवड ममता बालसदनचं काम बघतात, विनय शिरूर येथील काम बघतात ,मी संमती बालनिकेतन मांजरी येथील काम बघते, अरुण चिखलदरातील अश्रमाची काम बघतात. आम्ही सर्व मिळून हे संभाळत आहोत. पण आई गेल्यानंतर खूप त्रास झाला खूप खडतर होतं ते सगळं ती अचानक गेली जाण्याची ती वेळ नव्हती क्षणही नव्हता पण विधीलिखित होतो. कोसळलो- खचलो पण परत उमेदीने उभे राहिलो आई आमच्या सोबत देहाणी नसली तरी आजही ती बोटाला धरून चालवत आहे. एनजीओ चालवताना त्रास होतोच. पण ती आहे माझ्यासोबत असे मी मानते म्हणून जरा धीरही येतो.

•माईंच्या जाण्यानंतर काय बदललं?

आई असताना ती भाषण करायची एक असं गाव नाही, जिल्हा नाही, तालुके नाही, शाळा नाही, कॉलेज नाही जिथे तिने भाषण केले नसतील. तरी लोक मला आजही भेटल्यानंतर सांगतात की आमच्या इथे भाषण झालेल, आमच्या गावात भाषण झालेल. आईच्या भाषणांमधलं एक मास अपिलिंग असायचं की’ मी आई झाले तुम्ही गंगोत व्हा!’
अस ती भाषणांव्दारे अपील करायची व तेथून संस्थांना मदत यायची पण जेव्हा आई गेली तेव्हा तो प्रवास अचानक थांबला.
ती भाषणात थांबली, लोकांपर्यंत पोहचण थांबल.मग लोकांपर्यंत हा मेसेज जाणार कसा की ते काम पुढे चालू आहे. मी ते सुरू केले कारण लोकांपर्यंत ही पोहोचणे महत्त्वाचे आहे.आई म्हणायची जनता माझं सरकार आहे. कारण लोकआश्रयावर या संस्था उभ्या झाल्या आहेत.लोक पाठीशी उभे राहिले समाज पाठीशी उभा राहिला म्हणून ती एवढ मोठं काम करू शकली हे तिच्या कित्येक भाषणा मधून तिने सांगितले होते.आता मला समजत की त्याच समाजाकडे, लोकांकडे परत जायला हवे. त्यांना सांगायला हवे की माईंचे काम तसेच त्याच पद्धतीने चालू आहे तुम्ही या बघा काही प्रश्न असतील तर विचारा. त्यांचे निरसन होऊ द्या आणि पुन्हा एकदा आमच्या पाठीशी तसेच खंबीरपणे उभे रहा.

•माई असताना व माई नसताना काय फरक जाणवतो?

माझ्या आयुष्याचे दोन भाग झाले हे मी कायम म्हणते एक आई असताना व एक आई नसताना. मला असे वाटते की एका एका क्षणांनी माझंही आयुष्य कमी कमी होत आहे व मी तिच्या मागे जात आहे ती पुढे गेलीय व मी तिच्या मागून जाणार आहे. पण तिने सोपवलेलं काम मी जोपर्यंत आहे तोपर्यंत करत राहणार आहे. आईने दिलेली जबाबदारी, कर्तव्य अगदी प्रामाणिकपणे पार पडणार आहे शेवट तर प्रत्येकाच्या आयुष्यात येतोच.

•माई नसताना तुम्हाला जनाधार तसाच मिळतो आहे का?

तसाच मिळतो असे नाही म्हणता येणार पण काही लोक जी आहेत ती ठामपणे उभे आहेत. जसे की वील्लू पूनावाला फाउंडेशन, केटीएफ ग्रुप कल्याणी टेक्नोर्स . विल्लू पूनावाला यांच्याकडून ममता बालसदन चे बांधकाम करून देण्यात आले.काही ठराविक मदत ते महिन्याला पाठवत असतात. कल्याणी ग्रुप ऑफ टेक्नॉलॉजी यांच्याकडून आम्हाला धान्य दिलं जातं. या सर्व गोष्टींनी ३०- ४०% उसंत मिळते.पण बाकीच्या ५०-६०% टक्क्यांचा प्रवास, धडपड तर करावीच लागते.

महिला दिनानिमित्त तुमचा महिलांसाठी संदेश काय आहे. ‘Womens’ day special महिलांचा कोणता एक दिवस नसतो वर्षातील ३६५ दिवस हे सर्व महिलांचे असतात Womens day special . बाई म्हणजे उत्सव बाई म्हणजे सोहळा बाई म्हणजे महोत्सव ती जगण्याचा सोहळा करते ती तिला मिळतं किती यापेक्षा तिला देता किती येईल याचा विचार करते. मी माझ्या आईला बघितलं माझ्यासमोर हे सर्व करताना माझ्यासमोर माझ्या आईचे हे सर्वात मोठे उदाहरण आहे. बाई खचत नाही हरत नाही दिसतच पुढे जात असते यामुळे वर्षाचे ३६५ दिवस हे बाईचेच आहेत.

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी पुण्यात बौद्ध अनुयायांचा विराट मोर्चा

Share This News
error: Content is protected !!