सांस्कृतिक शहर असलेल्या पुणेनगरीत गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. एकीकडे पुणेकर या गुंडांना वैतागली आहे. अशातच एका श्रीमंत बापाच्या पोराने सिग्नलवर कार उभी करून रस्त्याच्या बाजूला लघुशंका करत अश्लील चाळे करणाऱ्या विकृत गौरव अहुजाला अखेरीस रात्री उशिरा लघुशंका करणारा गौरव आहुजा हा कराड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हा पठ्या स्टेशनला हजर होणार होता पण आधीत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.
पुण्यातल्या येरवडा भागातील शास्त्री चौकात शनिवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चौकात सिग्नलवर बीएमडब्ल्यू कारमधून उतरत लघुशंका करताना आणि असभ्य वर्तन करताना हा तरुण आढळून आला आहे. Cctv फुटेज मधून तरुणाला ओळखण्यात आलं.. गौरव आहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश निबजिया हे दोघे कारमध्ये होते. याप्रकरणी त्याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे. गौरव आहुजाने रस्त्यावर लघुशंका केली. त्याच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. तरुणाची सर्व माहिती मिळाली आहे..सगळीकडे तपास सुरू आहे, पोलिसांच्या टीम रवाना झाल्या आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली.. एका उच्चभ्रू घरातील तरुणाने असं रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी असं अश्लील वर्तन आणि माज दाखवण अतिशय निंदनीय आहे. विशेष म्हणजे त्याचे वडील मनोज आहुजा यांनी आपल्या मुलाच्या कृत्याबद्दल लाज व्यक्त केली आहे. आपला प्रताप समोर आल्यानंतर गौरव आहुजाने त्याचा फोन बंद केला आहे.. सकाळी असं कृत्य करून तो आणि त्याचा मित्र वाघोलीच्या दिशेने रवाना झाले. त्यानुसार गौरव अहुजाचा पोलिसांच्या पथकांकडून शोध सुरू आहे.. आता सगळ्यांना प्रश्न हाच पडला की हा गौरव अहुजा नेमका आहे तरी कोण? तर अहुजा याच्या घरची पार्श्वभूमीच मुळात गुन्हेगारी वृत्तीची आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये गौरव आहुजा ला तत्कालीन पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या पथकाने क्रिकेट बेटिंगच्या गुन्ह्यात अटक केली होती. क्रिकेट बेटिंग मध्ये एक हाय प्रोफाईल रॅकेट बस्ट करण्यात आलं होतं. त्यामध्ये गँगस्टर सचिन पोटेला मुख्य आरोपी करण्यात आलं होतं. या टोळीने कॉलेजच्या अनेक विद्यार्थ्यांना क्रिकेट बेटिंगच्या जाळ्यात ओढल्याचं तपासात निष्पन्न झाल होत. गौरव अहुजा सह त्याच्या मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओतून आता हा आहूजा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर माजोरडा तरुण गौरव आहुजा आणि त्याचे वडील मनोज आहुजा यांच्याबाबत पुण्यातले माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी देखील आता मोठा दावा केला आहे. गौरव आहुजा हा पहिल्यांदाच गुन्हेगार नाही, तो एक सवयीचा गुन्हेगार आहे.. त्याला कायदा माहित आहे, कायदेशीर पळवाटा कशा वापरायच्या आणि अटक कशी टाळायची हे माहित आहे. त्याचा मागील रेकॉर्ड घाणेरडा आहे, असं कुंभार यांनी म्हटल आहे. तसेच गौरव आहुजा आणि त्याचे वडील मनोज
आहुजा दोघांवरही क्रिकेट सट्टेबाजी, खंडणी आणि तुरुंगवास असे गुन्हेगारी खटले दाखल आहेत. यातली मजेशीर बाब म्हणजे गौरवच्या आधीच्या अटकेदरम्यान एका पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा देखील यात सामील असल्याच आढळून आल्याचा दावा विजय कुंभार यांनी केलाय…
श्रीमंत बापाच्या पोरांना एवढा माज आणि धाडस येत कुठून पुण्यात त्यांचा शक्तिशाली राजकीय संरक्षक कोण आहे? असा सवालही कुंभार यांनी उपस्थित केला आहे.. गेल्याच वर्षात पुण्यामध्ये याच हाय प्रोफाईल भागात पोर्शकार अपघात प्रकरण गाजलं.. बड्या बापाच्या पोराने मध्यधुंद अवस्थेत भरधाव वेगात दोन आयटी इंजिनियर तरुण आणि तरुणीला उडवलं.. त्यामुळे कल्याणी नगर, कोरेगाव पार्क, येरवडा परिसर अशा उच्चभ्रू भागातच सातत्याने घटना का घडत आहेत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.. यासह सर्वसामान्यांना वेगळा न्याय आणि श्रीमंतांना वेगळा न्याय असाही सवाल उपस्थित होत आहे..