रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून पेन तालुक्यात असणाऱ्या नाडा गावात अघोरी विद्या करून पैशांचा पाऊस पाडण्यासाठी आलेल्या भोंदू बाबाचा पेन पोलिसांनी पर्दाफाश केलाय
नाडा या गावच्या स्मशानभूमीत हा भोंदू बाबा अनेक मंत्र तंत्र म्हणत अघोरी विद्या करत असतानाच काही गावकऱ्यांना आढळून आला त्यावेळी हे अघोरी कृत्य करणाऱ्या तिघांनाही ग्रामस्थांनी पाहिलं आणि त्यानंतर ही बाब पोलिसांपर्यंत पोहोचवली. यामध्ये पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून एक जण अद्यापही फरार आहे. बिपिन अंबिका शर्मा वय 29 राहणार कोपरखैरणे व राजेश किसन म्हात्रे वय 40 राहणार कोपरखैरणे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून राजेंद्र प्रशांत शिर्के वय 27 राहणार कोपरखैरणे हा अजूनही फरार आहे.