पुणे, १२ सप्टेबरः विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि खेळ या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाचे आहेत. जीवनात या दोघांचा समतोल राखणे खूप गरजेचे आहे. हाच धागा पकडून नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलचे दोन विद्यार्थी असे आहेत ज्यांनी खेळाबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही उंच भरारी घेतली आहे. त्यांनी दाखविलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे आवडते विद्यार्थी बनले आहेत.
ध्रुव ग्लोबल स्कूलची कु. चिन्मयी आळंदकर आणि निल चितळे हे असे दोन विद्यार्थी आहेत, ज्यांनी शिक्षणाच्या जगात बारवीनंतर सीओईपी आणि आयआयटी भिलाई मध्ये प्रवेश घेतला आहे. तसेच क्रीडा जगात, चिन्मयने रायफल शुटींगमध्ये राष्ट्रीय स्तरावर पदके पटकावली आहेत. तर निल चितळे याने राष्ट्रीय स्तरावरील रायफल नेमबाजीत आपले कौशल्य दाखवले आहे.
विद्यार्थ्यांने शिक्षणावर लक्ष केंद्रित केले तर तो खेळात मागे पडतो. यामुळे त्याची शारीरिक स्थिती बिघडते. विद्यार्थ्यांला खेळाची आवड निर्माण झाली तर तो शिक्षणात मागे पडतो. त्याची मानसिक क्षमताही कमी होते. त्यामुळे मुलांसाठी शिक्षण आणि खेळ यांचा समताले राखणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक स्पर्धा, क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी व्हावे. यामुळे त्यांची शारीरिक प्रणाली, मन आणि शरीर ताजे राहते.
ध्रुव ग्लोबल स्कूलने शिक्षण आणि खेळ यांचा समतोल साधून विद्यार्थ्यांना परिपूर्ण बनविण्याचे काम करत आहे. हे दोन्ही विद्यार्थी सुरूवातीपासून एकाच शाळेत शिकत आहेत. शाळेतच शिक्षकांकडून रायफल शुटींगचे संपूर्ण प्रशिक्षण घेऊन त्यांनी राष्ट्रीय स्तरावर नाव कमावले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील बुद्धिमत्तेमुळे तसेच क्रीडा क्षेत्रातील प्रतिभा मुळे कु. चिन्मयीला सीओईपी मध्ये प्रवेश मिळाला आहे.
निल चितळे याने बारावी सायन्समध्ये सर्वाधिक गुण मिळवून आयआयटी, भिलाईमध्ये प्रवेश घेतला. खेळात कौशल्य दाखवण्याबरोबच रायफल शुटींगमध्ये ही राष्ट्रीय स्तरावर पोहोचून त्याने आपली वेगळी छाप सोडली आहे.
या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच मानसिक व शारीरिक विकासासाठी ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन संजय मालपाणी, मुख्याध्यापिका संगीता राऊतजी, सर्व शिक्षक व सर्व क्रीडा प्रशिक्षक विद्यार्थ्यांवर रात्रंदिवस मेहनत घेताना दिसतात. त्याचा परिणाम म्हणजे दोन्ही विद्यार्थी शिक्षण आणि क्रीडा जगात चमकत आहेत. त्याचप्रमाणे येणार्या काळात असंख्य विद्यार्थी आकाशाल गवसणी घातील.
ध्रुव ग्लोबल स्कूल, पुणे