पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने भीमा नदी खोरे क्षेत्रातील 26 धरणांपैकी 21 दरम्यान मधून पाणी सोडण्यात आलं, त्यामुळे पुण्यातील पाण्याचा प्रश्न अखेर मिटला आहे
उजनी धरण भरण्याच्या मार्गावर असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग भीमा नदी पात्रात सुरू करण्यात आला. त खडकवासला धरण क्षेत्रातील चारही धरणांच्या मोठा पाऊस झाल्याने मुळा मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. पुणे जिल्ह्यातील बहुतांश सर्वजण एक आटोकाठ भरल्याने पूर्ण नियंत्रणाखाली टप्प्याटप्प्यांमध्ये नद्यांमध्ये पाणी सोडले जात आहे.
पुण्यातील कोणत्या धरण साठ्यात किती पाणीसाठा शिल्लक आहे पाहूयात…
धरणाचे नाव पाणीसाठा टक्केवारी (टी एम सी)
येडगाव 1.76 90.44
वडज 0.71 60.43
डिंभे 11.68 93.47
चासकमान 7.13 94.81
पवना 7.90 92.82
मुळशी 18.60 92.29
वरसगाव 11.81 92.1
पानशेत 9.98 93.67
खडकवासला 1.51 76.37
भाटघर 23.50 100
वीर 8.80. 93.57
उजनी 44.96. 83.92
पुण्यातील घाट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने सर्वच नद्यांना पूर आला. जवळपास पुण्यातील सर्वच धरण हे काठोकाठ भरल्याने धरणातून नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग केला जात असल्यामुळे नदीकाठच्या सर्वच गावांना प्रशासनाकडून सतर्कता इशारा देण्यात आला आहे.
पुण्यात पाण्याचा प्रश्न मिटला; पाहा कोणत्या धरणात नेमका किती पाणीसाठा?