Crime

बँकेची परीक्षा देण्यासाठी निघाली होती, पण वाटेतच मृत्यूने गाठलं; नागपूरमधील अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज आलं समोर

71 0

राज्यभरात अपघातांचे प्रमाण वाढले असून अपघातांमध्ये अनेक नागरिक आपला जीव गमावत आहेत. नागपूर मध्ये देखील अशीच एक धक्कादायक दुर्घटना घडली. नागपूरमध्ये बँकेची परीक्षा देण्यासाठी निघालेल्या २६ वर्षीय तरूणीचा ट्रकच्या चाकाखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रियंका मानकर, असे या मृत तरूणीचे नाव आहे.

कसा झाला अपघात?

प्रियंका ती गेल्या अनेक दिवसांपासून बँकेच्या परीक्षेची तयारी करत होती. 3 जुलैला ती परीक्षा देण्यासाठी आपल्या भावाबरोबर दुचाकी वरून जात होती. दुचाकीच्या बाजूनेच भला मोठा ट्रक जात होता तर समोरून आणखी काही वाहने जात होती. त्यामुळे दुचाकीचे नियंत्रण बिघडले आणि दोघेही बहीण भाऊ खाली पडले. त्याचवेळी शेजारून जाणाऱ्या ट्रक खाली प्रियांका आली. ट्रकने चिरडल्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर तिचा भाऊ योगेश हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सध्या हाती आले असून या फुटेज मध्ये थर काप उडवणारी अपघाताची घटना कैद झाली आहे.

Share This News

Related Post

crime

Crime News : फोन चार्जला लावणं पडलं महागात, 9 महिन्यांच्या गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - August 26, 2023 0
सध्या एक धक्कादायक (Crime News) घटना समोर आली आहे. यामध्ये (Crime News) स्मार्टफोन वापरणे एका गर्भवती महिलेला चांगलंच महागात पडलं…

#CRIME : पत्नीला अद्दल घडवण्यासाठी तिच्या आईने दिलेल्या 44 लाखांची करवली चोरी; असा झाला उलगडा, मुंबईतील विचित्र घटना

Posted by - February 25, 2023 0
मुंबई : मुंबईच्या अंधेरी भागातून एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे 22 फेब्रुवारी रोजी भुलेश्वरला गेले…

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या संशयित आरोपीचे रेखाचित्र जारी

Posted by - March 24, 2022 0
पुणे- १३ वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेच्या स्वच्छतागृहात अज्ञात व्यक्तीकडून बलात्कार झाल्याच्या घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता पोलिसांकडून…
Bank Fraud

Bank Fraud : राज्यातील ‘या’ बँकेतील घोटाळा उघड; ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण

Posted by - March 31, 2024 0
बुलाढाणा : बुलाढाणा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये नांदुरा अर्बन बँकेला कनिष्ठ संगणक अधिकाऱ्यानेच (Bank Fraud) तब्बल…
Raigad News

Raigad News : सराव करणाऱ्याचीच झाली शिकार… तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - September 6, 2023 0
रायगड : रायगडमध्ये (Raigad News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Raigad News) भालाफेकीचा सराव करताना डोक्याला भाला लागून शालेय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *