Pune News

Pune News : पुण्यातील आणखी एका पबवर छापा; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

360 0

पुणे : एका पोर्शे कारनं दुचाकीवर असणाऱ्या तरुण, तरुणीला चिरडल्याची घटना (Pune News) घडली होती. हा अपघात गेल्या रविवारी पुण्यातील कल्याणीनगर भागात घडला होता. ही गाडी एक अल्पवयीन मुलगा चालवत होता. अपघात झाल्यानंतर त्याला लगेचच जामीन मिळाल्याने सगळीकडे संताप व्यक्त केला जात होता. यानंतर आरोपीचा जामीन रद्द करत त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली.

दरम्यान अपघातापूर्वी हा अल्पवयीनं आरोपी पबमध्ये जाऊन दारू पिल्याचं समोर आलं, त्यानंतर अल्पवयीन मुलाला दारू कशी काय देण्यात आली असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यानंतर पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळाले. यानंतर आता पुण्यातील आणखी एका पबवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून छापा टाकण्यात आला.

पुण्यातील ‘बॉलर’ पबवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. शनिवारी रात्री उशिरा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. पार्टी सुरू असतानाच उत्पादन शुक्ल विभागानं पबवर छापा टाकला. रजिस्टर मेंटेन न करणे, प्रिमायसेसच्या बाहेर दारू विक्री करणे, अल्पवयीन मुलांना दारू विक्री करणे, अशी अनेक कारण दाखवत या पब वर कारवाई करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sucess Story : स्पर्धा परीक्षेत अपयश आले मात्र तो खचला नाही… आता करतोय लाखोंची कमाई

KKR vs SRH : …तर एकही बॉल न खेळता KKR ला मिळणार आयपीएलची ट्रॉफी

KKR vs SRH : IPL Final मध्ये कसे असेल हवामान? कोणत्या संघाचे पारडे राहणार जड?

IPL Final : IPL फायनलमध्ये ‘या’ 5 खेळाडूंच्या कामगिरीवर असणार सगळ्यांचे लक्ष

Pune Porsche Car Accident : पुणे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; ‘ते’ CCTV फुटेज लागले पोलिसांच्या हाती

Sanjay Raut : गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी प्रयत्न केले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Buldhana Accident : शिर्डीवरून परतणाऱ्या भाविकांच्या स्कॉर्पिओचा भीषण अपघात

Baby Care Center : दिल्ली हादरली ! बेबी केअर सेंटरला लागली भीषण आग; 7 नवजात बाळांचा मृत्यू

Cyclone Update : काही तासांमध्ये ताशी 110 ते 120 किमी वेगानं चक्रीवादळ धडकणार; महाराष्ट्राबाबत IMD ने दिला ‘हा’ इशारा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!