पुणे : पुण्याच्या कल्याणीनगर भागात गेल्या रविवारी भीषण अपघात (Pune Porsche Car Accident) घडला होता. एका मद्यधुंद अल्पवयीन चालकानं दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना आपल्या अलिशान पोर्शे कारनं चिरडलं. या अपघातामध्ये अभियंता तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला. मात्र या प्रकरणात आरोपीला लगेच जामीन मिळाला होता. यामुळं सगळीकडे संतापाची लाट उसळली होती. यानंतर कोर्टाकडून त्याचा जामीन रद्द करून अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली होती. यानंतर आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तब्बल 100 पेक्षा अधिक सी सी टीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी करण्यात आली आहे. अग्रवाल यांचे निवास्थान, कोझी पब, ब्लॅक हॉटेल तसेच अपघात स्थळ अशा सगळ्या ठिकाणच्या सी सी टीव्ही फुटेजची तपासणी पोलिसांकडून करण्यात आली आहे. ज्या मार्गावरून त्या दिवसी पोर्शे गाडी फिरवण्यात आली, त्या मार्गावरील सर्व सीसीटिव्ही फुटेजची देखील तपासणी पोलिसांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे या सीसीटीव्ही फुटेजमधून काही महत्त्वाचे धागेधोरे गुन्हे शाखेच्या हाती लागण्याची शक्यता आहे.
काय घडले होते?
19 मे रोजी पुण्यातील कल्याणनगरमध्ये परिसारत भीषण अपघात झाला होता, या अपघातामध्ये पोर्शे कारने धडक दिल्यानं दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आतापर्यंत या अल्पवयीन आरोपीसह अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे. मुलाच्या वडिलांना आणि आजोबांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्याला दारू दिली म्हणून संबंधित पबमधील कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Sanjay Raut : गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी प्रयत्न केले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Buldhana Accident : शिर्डीवरून परतणाऱ्या भाविकांच्या स्कॉर्पिओचा भीषण अपघात
Baby Care Center : दिल्ली हादरली ! बेबी केअर सेंटरला लागली भीषण आग; 7 नवजात बाळांचा मृत्यू