नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजकोटमध्ये गेमझोनमधील आगीची घटना ताजी असताना आज सकाळी आगीच्या घटनेने (Baby Care Center) दिल्ली हादरली. दिल्लीच्या विवेक विहार परिसरात एका बेबी केअर सेंटरमध्ये शनिवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या बेबी केअर सेंटरमधून एकूण 12 बाळांना बाहेर काढण्यात आले. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून 5 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राजधानी दिल्लीतील विवेक विहार परिसरात एका बेबी केअर हॉस्पिटलला आग लागली. या दुर्घटनेत सहा नवजात बालकं दगावली आहे. शनिवारी रात्री जवळपास साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. पाहता पाहता आगीचे लोळ बाहेर पडू लागले. क्षणार्धातच आगीनं भीषण रौद्ररूप धारण केलं. आगी इतकी भीषण होती की, अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.