धक्कादायक ! शॉर्ट कपडे घातल्याच्या कारणातून पुण्यात काही तरुणींना मारहाण

694 0

शॉर्ट कपडे घालून परिसरात फिरतात म्हणून पुण्यात काही तरुणींना चप्पलने मारहाण करण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार खराडी येथील रक्षक नगर परिसरात घडला आहे.

मारहाण करण्यात आलेल्या तरुणी वेगवेगळ्या कंपनीत काम करतात. संबंधित तरुणी राहत्या परिसरात शॉर्ट कपडे घालून फिरतात, या कारणातून आरोपींनी त्यांना चप्पलनं मारहाण केली आहे.पोलिसांनी मारहाणीसह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा धक्कादायक प्रकार चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रक्षक नगर परिसरात घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ह्या खराडी येथील रक्षक नगर परिसरात पेइंग गेस्ट म्हणून राहतात. बुधवारी रात्री काही आरोपी त्यांच्या घरी आले होते. त्यांनी पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणी शॉर्ट कपडे घालून परिसरात फिरतात, असा आरोप करून भांडणाला सुरुवात केली. वाद वाढत गेल्यानंतर आरोपींनी पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणींना चप्पलने मारहाण केली.या प्रकरणी घरमालकीणीनं चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 448, 323, 504, 506, 143, 147, 149 अंतर्गत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तोकडे कपडे घालण्यावरून मारहाण झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!