धक्कादायक ! शॉर्ट कपडे घातल्याच्या कारणातून पुण्यात काही तरुणींना मारहाण

485 0

शॉर्ट कपडे घालून परिसरात फिरतात म्हणून पुण्यात काही तरुणींना चप्पलने मारहाण करण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार खराडी येथील रक्षक नगर परिसरात घडला आहे.

मारहाण करण्यात आलेल्या तरुणी वेगवेगळ्या कंपनीत काम करतात. संबंधित तरुणी राहत्या परिसरात शॉर्ट कपडे घालून फिरतात, या कारणातून आरोपींनी त्यांना चप्पलनं मारहाण केली आहे.पोलिसांनी मारहाणीसह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा धक्कादायक प्रकार चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रक्षक नगर परिसरात घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ह्या खराडी येथील रक्षक नगर परिसरात पेइंग गेस्ट म्हणून राहतात. बुधवारी रात्री काही आरोपी त्यांच्या घरी आले होते. त्यांनी पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणी शॉर्ट कपडे घालून परिसरात फिरतात, असा आरोप करून भांडणाला सुरुवात केली. वाद वाढत गेल्यानंतर आरोपींनी पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणींना चप्पलने मारहाण केली.या प्रकरणी घरमालकीणीनं चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 448, 323, 504, 506, 143, 147, 149 अंतर्गत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तोकडे कपडे घालण्यावरून मारहाण झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Share This News

Related Post

मोठी बातमी ! दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच ! दाऊदच्या भाच्यानेच केला खुलासा

Posted by - May 24, 2022 0
नवी दिल्ली- संयुक्त राष्ट्रानं घोषित केलेला दहशतवादी आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचे उघड झाले आहे.…

ट्विटरचा लोगो बदलला ? ब्लू-बर्ड च्या जागी Doge चा लोगो पाहून नेटकऱ्यांमध्ये धक्का !

Posted by - April 4, 2023 0
ट्विटरचे सीईओ एलोन मस्क यांनी आज मंगळवारी सकाळी ट्विटरच्या इतिहासातील सर्वात मोठा बदल करून लोकांना आश्चर्याचा धक्का दिला. यावेळी इलॉन…

बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेना आक्रमक ! शिवसेनेने घेतला मोठा निर्णय

Posted by - June 22, 2022 0
मुंबई- एकनाथ शिंदे आणि अन्य आमदारांच्या बंडखोरीने राज्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या अस्तित्वावर काळे ढग जमा झालेले आहेत. या बंडखोर आमदारांच्या…
Kolhapur News

Kolhapur News : ज्योतिबाचे दर्शन घेऊन परतत असताना कारचा भीषण अपघात

Posted by - September 10, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर आंबेवाडी (Kolhapur News) जवळ एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू…

Breaking News शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांवर ईडीची सर्वात मोठी कारवाई

Posted by - June 24, 2022 0
जालना – शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. खोतकर यांच्याशी संबंधित तब्बल ७८ कोटी ८० लाखांची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *