जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीजनिमित्त पाच फूट उंच आणि ३० फुटांचा घेर असलेली पगडी तुकोबांचरणी अर्पण करण्यात आली आहे. ही पगडी जगातली सर्वात मोठी पगडी असल्याची नोंद करण्यात आली आहे. कारण याची दखल वर्ल्ड रेकॉर्डस् इंडिया आणि जीनियस बुकने घेतली आहे. या पगडीचं नुकतच अनावरण करण्यात आलं. संत तुकाराम महाराज बीजेच्या निमित्ताने जगातील सर्वात मोठ्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पगडीचा लोकार्पण सोहळा श्रीक्षेत्र देहूत तुकोबांच्या मुख्य मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला.. सोनीगरा ज्वेलर्सचे दिलीप सोनीगरा यांनी ही पगडी देहू संस्थानला भेट दिली आहे. संत तुकाराम महाराजांच्या या पगडीचा घेर 30 फुटांचा असून याची उंची पाच फुटांपर्यंत आहे. ही पगडी पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात आली आहे. या अगोदर 28 फुटांच्या पगडीची विश्वविक्रमी नोंद झाली होती. परंतु यंदा 30 फूट घेर असलेली पगडी तयार करून हा विश्वविक्रम करण्यात आल्याचं प्रतिपादन पगडी बनवणारे शैलेश यादव यांनी केलं आहे.
