होळी सणानिमित् वरोरा शहरात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मद्य विक्री होत आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असून दारू विक्रेत्यांना चांगलीच मुभा मिळाली आहे. वेळेच्या पहिलेच दुकानाची सुरुवात होते.
ज्या व्यक्तीकडे लायसन सुद्धा नाही अशा व्यक्तींना मोठ्या प्रमाणात मद्य दिल्या जात आहे. यामध्ये अल्पवयीन मुलाचा वापर करून ही दारू वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवल्या जात आहे. या सणानिमित्त दारू दुकानांचे दर वाढले असून कोणत्याही प्रकारचे बिल दिले जात नाहीत. हा सगळा अनागोंदी कारभार संबंधित विभागाच्या देखरेखीखाली होत असल्याची चर्चा आहे. तालुक्यातील सर्व देशी विदेशी दुकानदार महिन्याचे कलेक्शन करत असून मोठी रक्कम संघटना देत असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच या विक्रेत्यांकडे कोणाचेही लक्ष नाही. शासना तर्फे ठराविक टॅक्स घेतल्या जातो मात्र त्याहीपेक्षा डबल टॅक्स ही दुकानदार ग्राहकाकडून वसूल करताना दिसत आहे. याचे बिल सुद्धा ग्राहकांना मिळत नाही. त्यामुळे ग्राहकांना बराच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या अवैध व्यवसायात लहान मुले येणारी पिढी ओढल्या जात असून यात्रा वार्ड परिसरात घरोघरी दारू विक्रेते तयार झाले आहे.
तालुक्यातील आजूबाजूला खेड्यांमध्ये याच शॉप मधून मोठ्या प्रमाणात दारू तस्करी केल्या जाते. बऱ्याच खेड्यामध्ये अवैध दुकान उभारले आहे.
लायसनधारक व परमिट रूम मध्येच मद्य विक्री केली जावी अशा सूचना असताना सुद्धा 24 तास अवैधरीत्या खुल्या आम दारूची विक्री शहरात सुरू आहे.
संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.