मुंबई- गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर रविवारी शिवाजी पार्क इथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवाजी पार्क या ठिकाणी लता मंगेशकर यांचं स्मारक उभारावं अशी मागणी भाजपा आमदार राम कदम यांनी केली आहे. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मागणीची गरज नाही, यावर राजकारण करू नका असा सल्ला दिला आहे.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर रविवारी शिवाजी पार्क इथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातले अनेक दिग्गज उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अंत्यसंस्कारासाठी हजेरी लावली.
शिवाजी पार्क या ठिकाणी लता मंगेशकर यांचं स्मारक उभारावं अशी मागणी भाजपा आमदार राम कदम यांनी केली आहे. या संदर्भात कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, ज्या ठिकाणी लतादीदी पंचतत्वात विलीन झाल्या त्याच ठिकाणी त्यांचं स्मारक बनवावं. जनतेच्या या मागणीची तत्काळ पूर्तता करावी. हे स्थळ जगासाठी एक प्रेरणास्थळ ठरेल, असं राम कदमांनी म्हटलं आहे.
या पत्राच्या शेवटी त्यांनी सुरुवातीला लता मंगेशकर यांचा चाहता असा उल्लेख केला असून शेवटी भाजपा आमदार लिहिले आहे.
यावर बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, लतादीदींनी कधीही विसरता येणार नाही. काहींनी पार्कात स्मारक बनवण्याची मागणी केलीय. मात्र मागणीची गरज नाही, यावर राजकारण करू नका. लता दिदींच्या स्मारकाबाबत देशानं विचार करण्याची गरज आहे, असं ते म्हणाले.