बांधकाम व्यावसायिक गणेश भिंताडे यांचे निधन

609 0

पुणे- बांधकाम व्यावसायिक आणि भाजपचे कार्यकर्ते गणेश भिंताडे (वय ४४) यांचे अल्पशा आजाराने पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. आज पहाटे २ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात पत्नी, आई आणि एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी धनकवडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गणेश भिंताडे यांना काही महिन्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यातून ते बरे झाले होते. पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे २ च्या सुमारास त्यांचे निधन झाले.

गणेश भिंताडे हे बांधकाम व्यावसायिक होते. त्यांनी भाजपच्या तिकिटावर पुणे महापालिकेची निवडणूक लढवली होती. थोड्या फरकाने त्यांचा पराभव झाला होता.

 

Share This News

Related Post

Pune News

Pune News : पुण्यात काँग्रेसचा पुन्हा धंगेकर पॅटर्न? ‘त्या’ पोस्टरची होतेय जोरदार चर्चा

Posted by - February 17, 2024 0
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीची राज्यासह देशातील सर्वच प्रमुख पक्षांनी (Pune News) जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रचार देखील सुरू…

अभिनेता सुनील शेंडे यांचे निधन, मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा

Posted by - November 14, 2022 0
मुंबई : आपल्या चतुरस्त्र अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपट तसेच हिंदी चित्रपट सृष्टी गाजणारे जेष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे सोमवारी निधन…

या नवरात्र उत्सवामध्ये महालक्ष्मीची अशी करा आराधना ; अवश्य मिळेल सुख-समृद्धी

Posted by - September 26, 2022 0
महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या नवरात्र उत्सवामध्ये हे काही उपाय अवश्य करा. घरामधील दारिद्र्य दूर होण्यास मदत होईल. त्यासह घरातील लक्ष्मी…

पुणे : अग्निशमन दलाच्या मुख्यालयात ‘संविधान दिवस’ निमित्त संविधान उद्देशिकेचे वाचन

Posted by - November 26, 2022 0
पुणे : भारतीय संविधान ज्या दिवशी स्वीकारले गेले, तो दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर. दरवर्षी हा दिवस “संविधान दिवस” म्हणून साजरा…

#FIREBRIGADE PUNE : लोहगाव मधील चार मजली इमारतीत तळमजल्यावर इलेक्ट्रिक मीटर बॉक्सला आग VIDEO

Posted by - January 20, 2023 0
पुणे : आज सकाळी लोहगाव-वाघोली रस्ता येथील संतनगर येथे चार मजली इमारतीत तळमजल्यावर इलेक्ट्रिक मीटर बॉक्सला आग लागली होती. पीएमआरडीए…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *