किरीट सोमय्यांची ‘सामना’मध्ये खिल्ली, अॅड. असीम सरोदे म्हणतात ‘ही भाषा अशोभनीय’

231 0

पुणे – भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याबाबत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात वापरलेली भाषा आक्षेपार्ह आहे, हा तर अपंगांचा अपमान आहे असा आरोप अॅड. असीम सरोदे यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या अपंग विभाग आयुक्तांनी स्वतःहून याप्रकरणाची दखल घेऊन नोटीस जारी करावी अशी मागणी सरोदे यांनी केली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर होते. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन ते राऊतांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार होते. तत्पूर्वी महापालिका परिसरात सोमय्या आलेले असताना काही शिवसैनिकांनी सोमय्या यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसंच त्यांना रोखण्याचा, अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी सोमय्या यांना शिवसेना कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे. या झटापटीत सोमय्या हे पायऱ्यांवर कोसळले. त्यांमुळे त्यांना दुखापत झाली. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

त्यानंतर सामनातून सोमय्यांची खिल्ली उडवत टीका करण्यात आाली. यामध्ये किरीट सोमय्या यांच्या नावाचा उल्लेख किलीट तोमय्या असा करण्यात आला. तसेच त्यांना धडा शिवण्याचीही भाषा करण्यात आली आहे. त्यावर अॅड. असीम सरोदे यांनी आक्षेप घेतला आहे. किरीट सोमय्या यांच्या तोत्र्या बोलण्यावर आधारित ही भाषा महाराष्ट्राला शोभणारी नाही, असा घणाघात असीम सरोदे यांनी केला आहे. तसेच अपंगत्वासह जगणाऱ्या लोकांचा अपमान करणारा अमानवीय दर्जा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. एवढंच नाही तर यावर महाराष्ट्राच्या अपंग विभाग आयुक्तांनी स्वतःहून याप्रकरणाची दखल घेऊन नोटीस जारी करावी अशी मागणी सरोदे यांनी केली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!