पिंपरी: उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) गुरुवारी दि. 22 जून रोजी पिंपरी-चिंचवड (Pimpari Chinchwad) महापालिकेत आले होते. यावेळी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात राहुल कलाटे (Rahul Kalate) यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. कलाटे यांच्या भेटीमुळे चिंचवड मतदार संघातील शिवसेना भाजपचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. मात्र, ही भेट व्यक्तिगत नसून सार्वजनिक असल्याचे सांगत राहुल कलाटे यांनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
NCP : राष्ट्रवादीमध्ये प्रदेशाध्यक्ष पदावरुन रणसंग्राम; अजित पवारांसह ‘या’ 5 नावांची होत आहे चर्चा
राहुल कलाटे यांची पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून ओळख आहे. राहुल कलाटे त्यांच्या पाठीशी सांगवी व पिंपळे गुरव परिसरातील काही आजी-माजी नगरसेवक व पदाधिकारी असल्याचे दिसून आले आहे. कलाटे यांनी शिंदेच्या शिवसेनेत यावे, यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. परंतु,राहुल कलाटे सध्या शिवसेना पक्षप्रवेशासाठी सावध भूमिका घेताना दिसून येत आहेत.
राहुल कलाटे यांनी गेल्या दोन निवडणुकीत चिंचवड मतदार संघातून शिवसेना आणि अपक्ष निवडणूक लढवत दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली आहेत. ‘चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवेळी मविआ’च्या नेत्यांनी मध्यस्थी करूनही राहुल कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नव्हता. 2017 मध्ये झालेल्या पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे 9 नगरसेवक निवडून आल्यानंतर पक्षाच्या गटनेतेपदी राहुल कलाटे यांची निवड झाली होती.