Beed Accident

Beed Accident : मित्राच्या लग्नाच्या निघालेल्या तरुणांचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू

768 0

बीड : बीडमध्ये (Beed Accident) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मित्राच्या लग्नाला निघालेल्या तीन मित्रांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला तर एक तरुण जखमी झाला आहे. जखमी तरुणावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या भीषण अपघातामुळे (Beed Accident) काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान महामार्ग पेट्रोलिंग पथकाने अपघातग्रस्त कार बाजूला केली आणि काही काळ विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली.

Accident : नाशिकमध्ये समोरासमोर धडक होऊन एसटी ट्रकचा भीषण अपघात

काय घडले नेमके?
बीडहून मध्यरात्री पेडगावच्या दिशेने जात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये कारमधल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने तीनवेळा पलटी खाल्ली आणि हा भीषण अपघात झाला. घोसापुरी शिवारात हा भीषण अपघात झाला.

Soalpur Accident: बाळूमामांच्या दर्शनाहून परतताना दुर्दैवी अपघातात दोन जिवलग मित्रांचा मृत्यू

मित्राच्या लग्नाला जाताना काळाचा घाला
धीरज गुणदेजा (वय 30 वर्षे), रोहन वाल्हेकर (वय 32 वर्षे), विवेक कानगुने (वय 33 वर्षे) अशी या अपघातात मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत तर आनंद वाघ (वय 28 वर्षे) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. मृत आणि जखमी हे सगळे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील रहिवासी होते. हे लोक घटनेच्या दिवशी च्या मित्राच्या लग्नाला जात असताना हा भीषण अपघात (Beed Accident) झाला.

Share This News

Related Post

Mumbai High Court

High Court : धाराशिवच्या नामकरणाबाबत उच्च न्यायालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - May 8, 2024 0
धाराशिव : उस्मानाबादचं नामकरण धाराशिव तर औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्यास राज्य सरकारनं (High Court) परवानगी दिली होती. दरम्यान उस्मानाबादचं…

मुलीला त्रास देत असल्याच्या आरोपावरून तरुणाला मारहाण ; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

Posted by - March 18, 2022 0
आपल्या मुलीला त्रास देतो असा आरोप करत मुलीच्या कुटुंबीयांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत मुलगा गंभीर जखमी…

महापालिकांच्या निवडणुकांसाठी 23 जूनला मतदारयाद्या प्रसिद्ध होणार

Posted by - June 17, 2022 0
पुणे- कल्याण डोंबिवली, नवी मुंबई ,उल्हासनगर, वसई-विरार, ठाणे, अमरावती, नागपूर, नाशिक, बृहमुंबई, सोलापूर आणि पिंपरी- चिंचवड या महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी…

TOP POLITICAL INFO: महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘असे’ नेते ज्यांना कायमच मुख्यमंत्रीपदानं दिली हुलकावणी दिलीय

Posted by - May 2, 2023 0
Edited by Sanket Deshpande: मी मुख्यमंत्री झालो तर… तुमच्या माझ्यासह अनेकांनी शाळेत असताना कल्पनाविस्तार निबंध प्रकारामध्ये हा निबंध लिहला असेल…
Ajinkya Kadam

Ajinkya Kadam : बॉडी बिल्डर अजिंक्य कदमचा हार्ट अटॅकने दुर्दैवी मृत्यू

Posted by - September 5, 2023 0
नालासोपारा : मुबईतील नालासोपारा याठिकाणी अजिंक्य कदम (Ajinkya Kadam) या 27 वर्षाच्या बॉडी बिल्डरचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *