उद्यापासून सार्वजनिक गणेशोत्सवाचे सुरुवात होत असून गणेशोत्सवाची वैभवशाली परंपरा लाभलेल्या पुण्यनगरीत मागील महिन्याभरापासूनच जयत तयारी सुरू असून पुण्यातील मानाच्या पाच गणपतींची आणि प्रमुख मंडळाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना ही दुपारपर्यंत होणार आहे..
मानाच्या गणपतींसह कोणत्या गणपतीची कधी होणार प्राणप्रतिष्ठापना?
- मानाचा पहिला श्री कसबा गणपती:
सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी उत्सव मंडपातून मिरवणुकीला सुरुवात होईल फडके हाऊस चौक देवाजी बाबा चौक दारूवाला पूल रस्ते वाडा जिवा महाले चौक मार्गे रास्ता पेठ येथील मूर्तिकार अभिजीत धोंडफळे यांच्याकडून घेतलेली गणेश मूर्ती पारंपारिक चांदीच्या पालखीत विराजमान करण्यात येईल त्यानंतर अष्टविनायकांपैकी एक असणाऱ्या सिद्धटेक च्या प्रतीकात्मक मंदिरात गणपती बाप्पा विराजमान होतील कोल्हापूर येथील सिद्धगिरी कन्हेरी मठाचे मठाधिपती आणि विश्वस्त काळ सिद्धेश्वर स्वामी यांच्या हस्ते सकाळी 11:37 मिनिटांनी श्री कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना होईल
- मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती:
सकाळी दहा वाजता न. चि. केळकर रस्त्यावरील मंदार लॉज चौकातून चांदीच्या पालखीतून बाप्पाच्या मिरवणुकीची सुरुवात होईल मंदार लॉज चौक कुंटे चौक नगरकर तालीम चौक आप्पा बळवंत चौका मार्गे उत्सव मंडपातील स्वानंद निवास गणेश प्रसादात प्राणप्रतिष्ठापना होईल श्री जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष श्रीगोविंददेवगिरीजी महाराज यांच्या हस्ते दुपारी बारा वाजून 11 मिनिटांनी प्राणप्रतिष्ठापना होईल
- मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम मंडळ:
सकाळी साडेदहा वाजता फुलांनी सजवलेल्या गजराथावर विराजमान बापाच्या मिरवणुकीला उत्सव मंडपातून सुरुवात होईल गुरुजी तालीम मंदिर गणपती चौक लिंबराज महाराज चौक आप्पा बळवंत चौक जोगेश्वरी चौक बेलबाग चौकातून उत्सव मंडपातील गजमहालात बाप्पा विराजमान होतील. युवा उद्योजक पुनीत वालन आणि जानवी धारिवाल पालन यांच्या हस्ते दुपारी 1 वाजून 31 मिनिटांनी श्रींची प्राणप्रतिष्ठापना होईल
- मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती:
तुळशी बागेतील श्रीराम मंदिरापासून प्रभू श्री रामचंद्रांच्या पालखीतून सकाळी दहा वाजता मिरवणुकीला सुरुवात होईल गणपती चौक लक्ष्मी रोज त्यांना नगरकर तालीम चौकातून उजवीकडे अप्पा बळवंत चौक बुधवार चौक बेलबाग चौक लक्ष्मी रस्त्याने गणपती चौकातून तुळशी वागले ओडिसातील पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराची गर्भगगृहाची प्रतिकृती असलेल्या उत्सव मंडपात बाप्पा विराजमान होतील उद्योजक कृष्णकुमार गोयल व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना होईल
- मानाचा पाचवा श्री केसरीवाडा गणपती:
सकाळी साडेनऊ वाजता न. चि.केळकर रस्त्यावरील रमणबाग प्रशाला चौकातून पारंपारिक पालखीतून मिरवणुकीला सुरुवात होईल रमणबाग चौकापासून केसरी वाड्यापर्यंत ही मिरवणूक असेल डॉ. दीपक टिळक, डॉ.गीताली टिळक, रोहित टिळक, डॉ. प्रणिती टिळक, रोनक टिळक यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता प्राणप्रतिष्ठापना होईल
- श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती:
उत्सव मंडपातून सकाळी 8 वाजून दहा मिनिटांनी मिरवणुकीला सुरुवात 10 भाऊसाहेब रंगारी भवन बुधवार चौक अप्पा बळवंत चौक फुटका बुरुज ते श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरापर्यंत मिरवणूक असेल प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्या हस्ते दुपारी 12:30 वाजता बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना होईल.
- अखिल मंडई गणपती मंडळ:
महात्मा फुले मंडईतील शारदा गजानन मंदिरापासून फुलांनी सजवलेल्या त्रिशूल रथातून सकाळी दहा वाजता मिरवणुकीची सुरुवात होईल अखिल मंडई मंडळ महात्मा फुले मंडई पोलीस चौकी बाबू गेनू चौक रामेश्वर चौक इथून पुन्हा बाबू गेनू चौक मार्गे उत्सव मंडप असा मिरवणुकीचा मार्ग असेल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर आणि त्यांच्या पत्नी अंजली काळकर यांच्या हस्ते दुपारी 12 वाजता बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना होईल
- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती:
मुख्य मंदिरापासून सिंह रथातून सकाळी साडेआठ वाजता मिरवणुकीला सुरुवात होईल मुख्यमंत्री आप्पा बळवंत चौक शनिपार चौक लोकमान्य टिळक पुतळा मंडईमार्गे बाप्पा उत्सव मंडपात विराजमान होतील कर्नाटकामधील हुमनाबाद येथील श्री दत्त सांप्रदायाचे श्री ज्ञानराज महाराज माणिक प्रभू यांच्या हस्ते सकाळी 11 वाजून 11 मिनिटांनी श्रींची प्राणप्रतिष्ठापना होईल
पुण्यातील मानांच्या पाचही गणपतीची प्राणप्रतिष्ठापना दुपारपर्यंत होणार असून ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात मिरवणुका निघणार आहेत..