दररोज महिला अत्याचारांच्या गंभीर घटना समोर येत आहेत. त्यातच आता एका भंगार गोळा करणाऱ्या महिलेला बळजबरी करून दारूपासून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना समोर आली.
मध्य प्रदेशातील उज्जैनमधील आगर नाका परिसरात ही घटना घडली आहे. भंगार गोळा करणाऱ्या महिलेला जबरदस्ती दारू पाजून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
कोतवाली क्षेत्राचे शहर पोलीस अधीक्षक ओम प्रकाश मिश्रा यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ‘आरोपीचे नाव लोकेश असून त्याने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिला जबरदस्ती दारू पाजली आणि तिच्यावर बलात्कार केला. ती घटना घडत असताना आसपास असणाऱ्या नागरिकांनी घटनेचा व्हिडिओ बनवून समाज माध्यमांवर पोस्ट केला. बलात्कार करून हा आरोपी पळून गेला. मात्र सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.’