पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची एक सप्टेंबरला रात्री 8वाजून 45 मिनिटांनी पुण्यातील नाना पेठ गोळीबार आणि कोयत्यानं वार करत खून करण्यात आला
या प्रकरणात वनराज आंदेकरांची सख्खी बहिण संजीवनी जयंत कोमकर हिच्यासह पोलिसांनी 13 जणांना अटक केली आहे.
यानंतर आता वनराज आंदेकरांचे वडील आणि आंदेकर टोळीचे प्रमुख कुख्यात गुंड सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. वनराज अंदेकर च्या खुणा नंतर आंदेकर कुटुंब काय करणार या प्रश्नाचं उत्तर बंडू अंदेकर यांनी दिला आहे.
‘नेकी का नाम अंदेकर का काम’ असं म्हणत वनराजच्या खुनाचा बदला आम्ही नक्की घेणार मात्र तो गुन्हेगारी पद्धतीने नाही तर न्यायालयीन प्रक्रियेतून घेणार असं बंडू आंदेकर न्यूज 18 लोकमत या मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. वनराजची सख्खी बहीण संजीवनी कुमकर ही पक्की वैरीन बनली असंही बंडू आदेकर म्हटले आहेत