pune police

Pune Police News : वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

599 0

पुणे : विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये (Pune Police News) सध्या गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दर्शना पवार हत्याकांडाने पुणे (Pune Police News) हादरलेले असताना काल पुन्हा एका मुलीवर भर दिवसा कोयत्याने वार करण्यात आला. सुदैवाने ती तरुणी या हल्ल्यातून वाचली. या वाढत्या घटनांमुळे पुणे (Pune Police News) पोलीस आता अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थित होवु लागल्याने पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.

Gondia News : गोंदिया हादरलं! विद्युत मोटर विहिरीत सोडताना शॉक लागून 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

काय घेतला निर्णय?
तरुणीवर कोयत्याने हल्ला झाल्यानंतर पुणे पोलीस अलर्ट मोडवर आली आहे. शहरातील सर्व पोलीस चौक्या 24 तास आणि सातही दिवस सुरू ठेवण्याचा पुणे पोलिसांनी घेतला आहे. प्रत्येक पोलीस चौकी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय अजून 150 बीट मार्शल वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातील 25 बीट मार्शल दामिनी पथकासाठी असणार आहेत. तसेच कोणत्याही तक्रारीकडे कानाडोळा न करण्याच्या सूचना सर्व पोलिसांना (Pune Police News) देण्यात आल्या आहेत.

Share This News
error: Content is protected !!