Mantralaya

Cabinet Meeting : मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ मोठे निर्णय

406 0

मुंबई : मुंबईमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) पार पडली. या बैठकीमध्ये (Cabinet Meeting) अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये महत्वपूर्ण निर्णय म्हणजे वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात आले आहे. तर एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू असं नाव देण्यात आलं आहे. तसेच दारीद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना देखील मोफत गणवेश वाटप करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आला.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

आजच्या बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय
1) वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव देण्यात आले.
2) एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू नाव देण्यात आले.
3) दारीद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना देखील मोफत गणवेश वाटपाचा निर्णय घेण्यात आला.
4) संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील लाभधारकांच्या निवृत्तीवेतनात भरीव वाढ करण्यात आली.
5) असंघटीत कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे.
6) नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात विदर्भाचा समावेश करण्यात आला आहे.
7) मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगरमध्ये उभारण्यासाठी 100 कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

Share This News

Related Post

महत्वाची बातमी ! कोरोनामुळे आशियायी क्रीडा स्पर्धा स्थगित

Posted by - May 6, 2022 0
बीजिंग- कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे जगभरात भीती निर्माण झाली आहे. जगभरात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. या…
Karuna Munde

Karuna Munde : स्वराज्य शक्ती सेनेच्या बीड जिल्हा कार्यालयाचे करुणा मुंडे यांच्या हस्ते उदघाटन

Posted by - November 30, 2023 0
बीड : आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी स्वराज्य शक्ती सेनेच्या बीड जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन स्वराज्य शक्ति सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष करुणा…
sharad pawar

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

Posted by - May 7, 2023 0
पंढरपूर : पंढरपूर जिल्ह्यात एक मोठी राजकीय घटना घडली आहे. पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील…

पर्वती मतदार संघाच्या रेशनिंग कमिटीची मीटिंग तातडीने घ्या-अश्विनी कदम

Posted by - May 1, 2022 0
दर महिन्याच्या १५ ते १८ तारखे पर्यंत सर्व दुकानामध्ये अन्न-धान्य उपलब्ध होते व ते ३० तारखे पर्यंत वाटप करणे अपेक्षित…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *