Pune News

Pune News : पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत साई पॉवर हिटर्स संघाने पटकावले विजेतेपद

631 0

पुणे : पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक आणि मीडिया यांंच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत साई पॉवर हिटर्स संघाने शिवमुद्रा ब्लास्टर्स संघाचा ३७ धावांनी पराभव करून सलग दुसर्‍या वर्षी स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.

सहकारनगर येथील ल.रा. शिंदे हायस्कुलच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात साई पॉवर हिटर्सच्या हुमेद खान याच्या अष्टपैलु खेळीच्या जोरावर संघाने विजेतेपद साकार केले. पहिल्यांदा फलंदाजी करताना साई पॉवर हिटर्सने ९२ धावांचे लक्ष्य उभे केले. ४ गडी बाद ३१ धावा असा संघ अडचणीत सापडलेला असताना संघाच्या हुमेद खान याने ४५ धावांची खेळी करून संघाचा डाव सावरला. कर्णधार श्रीधर मोहोळ याने २५ धावा करून हुमेद याला उत्तम साथ दिली. या दोघांनी पाचव्या गड्यासाठी ३३ चेंडूत ६८ धावांची भागिदारी केली. या आव्हानासमोर शिवमुद्रा ब्लास्टर्स संघाचा डाव ५५ धावांवर मर्यादित राहीला. साई संघाच्या हुमेद खान याने ११ धावात ४ गडी बाद करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुनित बालन ग्रुपचे संचालक पुनित बालन आणि माणिकचंद ऑक्सिरीचच्या संचालिका जान्हवी धारीवाल-बालन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक (कारागृह) श्री. अमिताभ गुप्ता, प्रसिध्द सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे, माजी आमदार जगदीश मुळीक, दिक्षीत मोटर्सचे श्रेयस दिक्षीत, मोहनदादा जोशी, पुणे पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, नितीन पंडीत, कुमार रेणूसे, योेगेश शांडिल्य, गगनदीप ओबोरॉय, शिरीष मोहीते, अनिल सपकाळ, प्रसाद कुलकर्णी यांच्यासह पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळांचे अध्यक्ष, मंडळाचे सदस्य, कार्यकर्ते, ढोल-ताशा पथकातील सदस्य, मीडिया क्षेत्रातील मान्यवर सदस्य व सहभागी संघ आणि संघातील खेळाडू आदि उपस्थित होते.

यावेळी पुनित बालन ग्रुपचे संचालक पुनित बालन यांच्यावतीने पुणे पोलिस कल्याण निधीला ५ लाख रुपयांची देणगी देण्यात आली. विजेत्या साई पॉवर हिटर्स संघाला २ लाख ११ हजार रूपये व करंडक तर, उपविजेत्या शिवमुद्रा ब्लास्टर्स संघाला १ लाख ११ हजार रूपये आणि करंडक देण्यात आला. मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेल्या रूपक तुबाजी याला ५१ हजार रूपये आणि इलेट्रिकल बाईक देण्यात आली. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज- कपिल राऊत, सर्वोत्कृष्ट गोलंदाज- हुमेद खान, सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक- आदित्य अष्टपुत्रे, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक- प्रथमेश गोवकर या सर्व खेळाडूंना प्रत्येकी २१ हजार रूपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आला. फेअर प्ले पुरस्कार तुळशीबाग टस्कर्स आणि मीडिया रायटर्स या दोन संघांना देण्यात आला.

सामन्यांचा संक्षिप्त निकालः अंतिम सामना
साई पॉवर हिटर्सः १० षटकात ७ गडी बाद ९२ धावा (हुमेद खान ४५, ६ चौकार, २ षटकार), श्रीधर मोहोळ २५, रूपक तुबाजी २-२६) वि.वि. शिवमुद्रा ब्लास्टर्सः १० षटकात ९ गडी बाद ५५ धावा (रोहीत खिलारे ११, तुषार आंबट १०, हुमेद खान ४-११, निखील वाटणे १-२); सामनावीरः हुमेद खान

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Rahul Gandhi : खळबळजनक ! राहुल गांधींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

PCMC Drugs : ड्रग्स प्रकरणात बेईमान पोलीस अधिकाऱ्याला अटक

Loksabha 2024: महाराष्ट्रातील ‘या’ मतदारसंघात यंदा तब्बल 250+ उमेदवार?

Vasai News : धक्कादायक ! वसईत स्कूल बसने दोन मुलींना चिरडलं

Maharashtra Politics : महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद ‘या’ जागांवर अजूनही एकमत नाही

Gautam Gambhir Quit Politics: PM Modi थॅंक्स, आता पुन्हा लोकसभा….; गौतम गंभीरने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Manoj Jarange : जरांगे पाटलांची प्रकृती अचानक खालावली; डॉक्टरांचं पथक मध्यरात्री अंतरवालीत दाखल

Weather Update : राज्यात आज पावसाची दाट शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

Pension : निवृत्तीवेतनधारकांसाठी मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Vrikshasana : वृक्षासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide