PCMC Drugs

PCMC Drugs : ड्रग्स प्रकरणात बेईमान पोलीस अधिकाऱ्याला अटक

540 0

पिंपरी चिंचवड : पोलीस दलातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवडमधील ड्रग्स (PCMC Drugs) प्रकरणी एका PSI ला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता पोलिसचं ड्रग्सचे रखवालदार बनले आहेत का? असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. विकास शेळके असं अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाच नाव आहे. ते निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
शुक्रवारी पहाटेच्या सुमारास रक्षक चौकात दोन कोटींच मेफेड्रोन ड्रग्स आढळलं होत. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी नमामी झा ला अटक केली होती. या प्रकरणाचा तपास सुरु असताना ड्रग्स प्रकरणात आता निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक विकास शेळकेच नाव समोर आलं आहे. अशा गंभीर गुन्ह्यात पोलीस अधिकाऱ्याचे नाव आल्याने पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात एकच खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी केलेल्या कारवाईत दोन किलो आणि आजच्या कारवाईत पोलिसाकडूनच 42 असे एकूण 45 किलो एमडी ट्रक्स जप्त करण्यात आलं. या ड्रग्स ची किंमत तब्बल 45 कोटी इतकी आहे. या तपासादरम्यान पिंपळे निलखमधल्या रक्षक चौकात एका अज्ञात व्यक्तीला सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर ही बाब उघड झाली आणि नमामी शंकर झा अस अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी थेट पोलीस उपनिरीक्षकाला अटक केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha 2024: महाराष्ट्रातील ‘या’ मतदारसंघात यंदा तब्बल 250+ उमेदवार?

Vasai News : धक्कादायक ! वसईत स्कूल बसने दोन मुलींना चिरडलं

Maharashtra Politics : महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद ‘या’ जागांवर अजूनही एकमत नाही

Gautam Gambhir Quit Politics: PM Modi थॅंक्स, आता पुन्हा लोकसभा….; गौतम गंभीरने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Manoj Jarange : जरांगे पाटलांची प्रकृती अचानक खालावली; डॉक्टरांचं पथक मध्यरात्री अंतरवालीत दाखल

Weather Update : राज्यात आज पावसाची दाट शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

Pension : निवृत्तीवेतनधारकांसाठी मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Vrikshasana : वृक्षासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!