Pune News : अलविरा मोशन अँड एंटरटेंमेन्ट फिल्म प्रॉडक्शन व ‘बिगिनिंग ऑफ इंडिया शायनिंग’ ‘या’ एनजीओच्या नवीन शाखेचे उद्घाटन

533 0

पुणे : अलविरा मोशन अँड एंटरटेंमेन्ट फिल्म प्रॉडक्शन व ‘बिगिनिंग ऑफ इंडिया शायनिंग’ या एनजीओच्या नवीन शाखेचे (Pune News) उद्घाटन आज आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार, राजकुमार गबाले (तहसीलदार), अलविरा मोशन अँड एंटरटेंमेन्ट फिल्म प्रॉडक्शनच्या संचालिका दीपाली कांबळे, आप्पासाहेब गवारी, अमोल उगले, दत्तात्रय साळुंखे, मंदाकीनी कांबळे, रंगनाथ कांबळे, आशिष कांबळे, आदी उपस्थित होते.

यापूर्वी ‘बिगिनिंग ऑफ इंडिया शायनिंग’या एनजीओच्या मार्फत अनाथ आश्रमाला मदत, गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य, गरीब विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च करणे अशा स्वरूपाची मदत करण्यात आली आहे. तसेच कोरोना काळात जुन्नर मधील आळेफाटा येथे असलेल्या वस्तीतील प्रत्येक कुटूंबाला राशन पोचवले गेले आहे. तर ‘अलविरा मोशन अँड एंटरटेंमेन्ट फिल्म प्रॉडक्शन’ अंतर्गत वेबसिरिज,अँड मेकिंग, आल्बम शूट आदी केले जात आहेत. अलविरा मोशन अँड एंटरटेंमेन्ट फिल्म प्रॉडक्शनची पहिली शाखा मुंबई मध्ये सुरू करण्यात आली असून त्यानंतर दुबई अन् आता सांस्कृतिक नगरी असलेल्या पुणे शहरात अलविरा मोशन अँड एंटरटेंमेन्ट फिल्म प्रॉडक्शनची नवीन शाखा सुरू होत आहे.

नवीन शाखेच्या उद्घाटनावेळी अलविरा प्रॉडक्शनच्या ALLVEERAA.INN या मॅगजिनचे प्रकाशन करण्यात आले. त्याच बरोबर चॅरिटी वॉकमध्ये सहभागी झालेल्या मॉडेल्स ला प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. नवीन वर्षांच्या पार्श्वभूमीवर अलविरा प्रॉडक्शनच्या वतीने दिग्गज कलाकारांचे छायाचित्र असलेल्या 2024 चे कॅलेंडेर तयार करण्यात आले आहे. याचे अनावरण देखील यावेळी करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना आमदार निलेश लंके म्हणाले, ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी दीपाली कांबळे आज प्रॉडक्शन हाऊस सुरू केले ही अभिमानाची बाब आहे. दीपाली यांनी नेहमी सकारात्मक भूमिका घेत आपली वाटचाल केली आहे, कोविड काळात त्यांनी अनेक रुग्णांना जिवादान दिले, अनेक कुटुंबांना मदतीचा हात दिला, सर्वसामान्य कुटुंबातील मुला – मुलींनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Kolhapur News : महिलेने ‘त्या’ गोष्टीला नकार देताच आरोपीने केलेल्या कृत्याने संपूर्ण गाव हादरलं

Marathi Natya Sammelan : 100 व्या अ. भा. मराठी नाट्य संमेलन शुभारंभ सोहळ्यानिमित्त पुण्यात वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Palghar Accident : पालघरमध्ये एसटीचा भीषण अपघात; 2 चिमुकल्यांचा मृत्यू, 15 जखमी

Selfie Accident News : सेल्फी ठरला जीवघेणा ! प्रबळगडावरून कोसळून 24 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Raigad Accident : पुण्याहून कोकणात जाणाऱ्या बसचा ताम्हीणी घाटात भीषण अपघात

Raigad Accident : पुण्याहून कोकणात जाणाऱ्या बसचा ताम्हीणी घाटात भीषण अपघात

Kondhwa News : कोंढव्यातील जीममध्ये किरकोळ वादातून मारहाण; CCTV व्हिडिओ आला समोर

Farmer News : पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Pune Accident : पुण्यातील जांभुळवाडी नवीन बोगद्यामध्ये भीषण अपघात

IND Vs RSA 2nd Test : फिटनेस टेस्टमध्ये शमी अपयशी; त्याच्या जागी ‘या’ खेळाडूचा संघात समावेश

Karnatak News : शाळेच्या सहलीत मुख्याध्यापिकेने विद्यार्थ्यासोबत केले अश्लील चाळे; पालकांनी व्यक्त केला संताप

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!