कोल्हापूर : कोल्हापूरमधून (Kolhapur News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये आरोपीने शरीरसुखाची मागणी नाकारल्याने एका महिलेची गळा आवळून हत्या केली आहे. इतकंच नाही तर प्रकरण समोर येऊ नये म्हणून मृतदेह ऊसाच्या फडात टाकून फड पेटवून लावत मृतदेह नष्ट करण्याचा प्रयत्नदेखील आरोपीने केला. ही धक्कादायक घटना गुरुवारी रात्री आजरा तालुक्यातील भादवण या गावामध्ये घडली.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील भादवण या गावात मृत आशाताई मारूती खुळे (वय 42 वर्ष) ही महिला आपल्या पतीचे निधन झाल्याने आई सोबत राहत होती. गुरुवारी (दि 28) रोजी संशयित आरोपी योगेश पांडूरंग पाटील (वय 35 रा. भादवण) याने दुपारच्या सुमारास भादवण ते भादवणवाडी रस्त्यावर सदर महिलेले गाठले आणि बाजूला असलेल्या उसाच्या फडात सदर महिलेला ओढत घेऊन गेला. यावेळी योगेश याने सदर महिलेला बळजबरी करत शरीर सुखाची मागणी केली. मात्र, त्यावेळी आशाताईने त्याला विरोध केल्याने संशयित आरोपी योगेशने रागाच्या भरात तिचा गळा आवळून खून केला.
यानंतर त्याने हि हत्या उघडकीस येऊ नये म्हणून सदरमहिलेचा मृतदेह उसाच्या फडात टाकला आणि उसाचा फड पेटवून लावत मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायंकाळी उसाला आग लागल्याचे कळताच गावकऱ्यांनी ते विजवण्यासाठी धाव घेतली. आग शांत झाल्यानंतर शेतात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने गावकऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली आणि हा सगळा प्रकार समोर आला. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास करून आरोपी योगेशला अटक केली.तो विवाहित असून त्याला दोन मुली आहेत. त्याच्यावर आजरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Palghar Accident : पालघरमध्ये एसटीचा भीषण अपघात; 2 चिमुकल्यांचा मृत्यू, 15 जखमी
Selfie Accident News : सेल्फी ठरला जीवघेणा ! प्रबळगडावरून कोसळून 24 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू
Raigad Accident : पुण्याहून कोकणात जाणाऱ्या बसचा ताम्हीणी घाटात भीषण अपघात
Raigad Accident : पुण्याहून कोकणात जाणाऱ्या बसचा ताम्हीणी घाटात भीषण अपघात
Kondhwa News : कोंढव्यातील जीममध्ये किरकोळ वादातून मारहाण; CCTV व्हिडिओ आला समोर
Farmer News : पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Pune Accident : पुण्यातील जांभुळवाडी नवीन बोगद्यामध्ये भीषण अपघात
IND Vs RSA 2nd Test : फिटनेस टेस्टमध्ये शमी अपयशी; त्याच्या जागी ‘या’ खेळाडूचा संघात समावेश
Yavatmal Crime : यवतमाळ मेडिकल कॉलेजमध्ये MBBS विद्यार्थीनीने उचलले टोकाचे पाऊल
Flight Cancelled : खराब हवामानामुळे पुण्यातून दिल्ली, हैदराबाद, गोव्याकडे जाणारी 14 विमाने रद्द