पुणे : महिला दिनाचे औचित्य साधून जीवन प्रशिक्षक (लाइफ कोच) शलाका तांबे यांनी पुण्यातील (Pune News) ऑर्किड हॉटेलच्या ग्रँड चेंबर्स हॉलमध्ये ‘बर्थ ऑफ अ मदर : रि-बर्थ ऑफ अ वुमन’ या आपल्या पहिल्या पुस्तकाचे अनावरण केले. प्रमुख पाहुणे म्हणून सकाळ मीडिया ग्रुपच्या कार्यकारी संपादिका शीतल पवार यांच्या हस्ते एका दिमाखदार कार्यक्रमात या पुस्तकाचे उद्घाटन करण्यात आले.
तांबे यांच्या पुस्तकात मातृत्वाच्या कथेची व्याख्या नव्याने करण्यात आली असून नऊ महिन्यांच्या या कायापालट करणाऱ्या अनुभवाच्या भावनिक, मानसिक आणि आध्यात्मिक आयामांतून महिलांना मार्गदर्शन केले आहे. या पुस्तकात करुणा, काळजी आणि आत्मविश्वास यावर भर देण्यात आली आहे आणि हे पुस्तक व्यावहारिक साधने आणि अंतर्दृष्टी प्रदान करते जेणेकरून स्त्रियांना मातृत्वाच्या प्रवासात सक्षम करता येईल.
शलाका म्हणाल्या, “ज्या दिवशी बाळ जन्माला येते, त्या दिवशी आई जन्माला येते आणि एक स्त्री पुनर्जन्म घेते. बाळाचा जन्म आणि आईचा जन्म या एकमेकांमध्ये गुंफलेल्या अशा दोन समांतर घटना आहेत. हे आपण आवर्जून मान्य केले पाहिजे. आयुष्य बदलणाऱ्या या घटनेवर लक्ष केंद्रित करणे आणि स्त्रीची आई म्हणून सहज भावनिक, मानसिक आणि आध्यात्मिक उत्क्रांती होण्यासाठी जाणीवपूर्वक काय करणे आवश्यक आहे हे समजून घेणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे.”
“नऊ महिन्यांच्या गरोदरपणात आपल्या मनात व शरीरात घडणाऱ्या बदलांसाठी नवीन माता अनेक वेळा तयार नसतात. या पुस्तकामुळे त्यांना प्रत्येक छोट्या बदलाची शारीरिक व भावनिकदृष्ट्या जाणीव होण्यास मदत होते. बाळाला जन्म दिल्यावर एक स्त्री म्हणून पुनर्जन्माच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताना हा प्रवास सकारात्मकतेने स्वीकारायला त्यांना शिकवले जाते. महिलांना कायापालट करणाऱ्या मातृत्वाच्या वाटचालीसाठी मार्गदर्शन करणाऱ्या शलाकाच्या मौल्यवान अंतर्दृष्टी असलेल्या या पुस्तकाचे उद्घाटन करताना मला आनंद होत आहे”, असे शीतल पवार म्हणाल्या.
या कार्यक्रमात शलाका तांबे आणि शीतल पवार यांच्यात मनोरंजक चर्चा झाली व त्यांनी पुस्तकामागील प्रेरणा सांगितली आणि त्यातील प्रमुख विषयसूत्र आणि संदेश जाणून घेतले. तांबे आणि पवार यांच्याशी संवाद साधण्याची संधी पाहुण्यांना मिळाली आणि त्यातून मातृत्व व भावनिक आरोग्याविषयी आपापल्या दृष्टिकोनाची सखोल माहिती मिळाली. कार्यक्रमाची सांगता शलाका तांबे यांच्या पुस्तकावर स्वाक्षरी करण्याच्या सत्राने झाली.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Womens Day 2024 : जॅसिंथा कल्याण बनली पहिली महिला पीच क्युरेटर; कोण आहेत जॅसिंथा कल्याण?
Rohit Pawar : रोहित पवारांना मोठा धक्का ! कन्नड सहकारी साखर कारखान्यावर ईडीची जप्ती
Mahashivratri : महाशिवरात्रीच्या दिवशी मोठी दुर्घटना; विजेचा शॉक बसून 14 मुले जखमी
Kranti Redkar : अभिनेत्री क्रांती रेडकरला जीवे मारण्याची धमकी; स्क्रिनशॉट्स झाले व्हायरल
Narendra Modi : अशक्यप्राय परिवर्तन मोदींनी करुन दाखवलं : शंकर अभ्यंकर
Sudha Murty : सुधा मूर्तींची राज्यसभेवर नियुक्ती; राष्ट्रपतींनी केली घोषणा
Hemangi Kavi : जागतिक महिला दिनानिमित्त हेमांगी कवीने शेअर केली हृदयस्पर्शी पोस्ट
Buldhana Accident : वाहनांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू
Kedar Shinde : बाईपण भारी देवा नंतर येतोय ‘आईपण भारी देवा’; केदार शिंदेकडून नव्या सिनेमाची घोषणा
Dolly Sohi : ‘हिटलर दीदी’ फेम अभिनेत्री डॉली सोही हिचं निधन
Mahashivratri : महाशिवरात्रीच्या निमिताने जाणून घेऊया भारतातील शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांबद्दल
Women’s Day Special : आज महिला दिनाच्या निमित्त महिलांच्या अधिकारांबद्दल जाणून घेऊया
Virabhadrasana : वीरभद्रासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?