देशभरात भगवान शिवजिंची 12 ज्योतिर्लिंगे आहेत. ज्योतिर्लिंग अर्थातच प्रकाश स्तंभ आहे. असे मानले जाते की ह्या 12 ठिकाणी भगवान शिवाचे ज्योतिर्लिंग स्थित आहेत त्या ठिकाणी आजही शिवजी ज्योती रूपात विराजित आहेत आणि त्या जागेचे रक्षण करतात. म्हणूनच हिंदू धर्माच्या बारा ज्योतिर्लिंगांचे महत्त्व खूप जास्त आहे.चला तर मग या 12 शिवलिंगांबद्दल जाणून घेऊया…
1) सोमनाथ ज्योतिर्लिंग
12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिल्या ज्योतिर्लिंग बद्दल म्हटलं तर सोमनाथ ज्योतिर्लिंग पहिल्या क्रमांकावर येते. हे मंदिर भारतातील गुजरात अंतर्गत सौराष्ट्र नावाच्या प्रदेशात स्थित आहे असे म्हटले जाते की आपल्या संपूर्ण पृथ्वीवरील हे पहिले ज्योतिर्लिंग आणि जगात प्रथमच स्थापना करण्यात आली आहे. या ठिकाणी सोमनाथ कुंड म्हणून ओळखले जाणारे एक कुंड आहे, ज्याची निर्मिती देव- देवतांनी मिळून केली असल्याचे सांगितले जाते.
2 ) मलिकार्जुन ज्योतिर्लिंग
हे ज्योतिर्लिंग भारताच्या आंध्र प्रदेश राज्यांतर्गत कृष्णा नदीच्या काठी वसलेल्या श्रीशैलम नावाच्या पर्वतावर आहे. इतकेच न्हवे तर हे ज्योतिर्लिंग आपल्या देशातील 12 ज्योतिर्लिंग मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे त्यामुळे याला खूप महत्त्व असून लाखो भक्त येथे दर्शनासाठी येतात.
3) महाकालेश्वर ज्योतिर्लिंग
भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन नगरीत शिवाचे मोठे मंदिर आहे. देशात 12 ज्योतिर्लिंगांपैकी तिसऱ्या स्थानावर आहे. असे म्हटलं जाते की याचे दर्शन केल्याने व्यक्तीला मोक्ष प्राप्ती होते. एवढेच न्हवे तर महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यास मृत्यू त्या व्यक्तीला हानी पोहोचवू शकत नाही. या ज्योतिर्लिंगाचं उल्लेख महाभारतात देखील आहे जेणेकरून त्याचा इतिहास किती जुना असेल याची कल्पना येते. तुलसीदासजींनीही स्वतःच्या लिखान्यात या मंदिराची खूप प्रशंसा केली आहे.
4) ओमकारेश्वर ज्योतिर्लिंग
हे मंदिर भारतातील बारा ज्योतिर्लिंगांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे जे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील खंडवा जिल्ह्यात स्थित आहे. भगवान शिवाला समर्पित हे मंदिर नर्मदा नदीच्या मध्यभागी शिवपुरी नावाच्या बेटावर आहे. येथे दर्शनासाठी लाखो लोक येतात आणि नुसतेच दर्शन घेतल्याने लोकांचे सर्व मनोकामना पूर्ण होतात.
5) केदारेश्वर ज्योतिर्लिंग
हिंदू धर्मातील चार धर्मांपैकी हे एक खास ठिकाण आहे. जिथे लाखो लोक चारधामला भेट देण्यासाठी आणि केदारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जातात. जर केदारेश्वर ज्योतिर्लिंग विषयी म्हटलं तर हे मंदिर भारताच्या उत्तराखंड राज्यांतर्गत केदार नावाच्या हिमालय पर्वताच्या शिखरावर वसलेले असून केदारनाथ मंदिर म्हणून ओळखले जाते किंवा केदारेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून ओळखलं जातं. असं म्हटलं जातं की जर एखाद्या भक्तांनी येथे जाऊन शंकराला जल अर्पण केलं तर त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि त्याला अपार सौभाग्य प्राप्त होतं.
6) भीमाशंकर ज्योतिर्लिंग
हे मंदिर महाराष्ट्रातील पुण्याहून सुमारे 110 किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वतावर शिवाचे प्रसिद्ध मंदिर आहे. हे भगवान शिवाच्या बाराव्या ज्योतिर्लिंगांपैकी सहाव्या क्रमांकावर आहे. येथे असलेले भगवान शिवाचे शिवलिंग आकाराने थोडे जाड आहे म्हणून ह्याला मोटेश्वर ज्योतिर्लिंग असेही म्हणतात असे म्हटलं जाते की या ठिकाणी येऊन भगवान शंकराकडे तुमची कोणतीही इच्छा मागितली तर नक्कीच पूर्ण होते.
7) विश्वनाथ ज्योतिर्लिंग मंदिर
भारताच्या काशी अंतर्गत विश्वनाथ मंदिर म्हणून ओळखले जाणारे भगवान शिवाचे एक विशाल मंदिर आहे. ते आपल्या देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी सातव्या क्रमांकावर आहे. एका काळी भगवान शिव आणि पार्वतीच्या लग्नानंतर भगवान शिव कैलास पर्वतावर राहत होते आणि पार्वती त्यांच्या वडिलांकडे होती जेथे त्यांना बरं न वाटण्यामुळे पार्वती जिने शिवजींना वडिलांच्या ठिकाणी यावे आणि त्यांना तिथून घेऊन जावे असा आग्रह केला. त्यानंतर शिवजी पार्वतीकडे गेले आणि त्यांना तिथून काशीला जाऊन वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांनी या ठिकाणी स्वतःची ज्योती म्हणून स्थापना केली जिथे आता हे विश्वनाथ ज्योतिर्लिंग स्थित आहे.
8) त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर
त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराबद्दल बोललो तर ते आपल्या देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आठव्या क्रमांकावर आहे. भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक नगर येथे स्थित आहे. हे मंदिर गोदावरी नदीच्या उगम स्थान असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतावर वसलेलं आहे या ठिकाणी ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजे शिवाचे रूप धारण केलेली तीन छोटी शिवलिंगे आहेत. असे म्हणतात या ठिकाणी दर्शन घेतल्याने भाविकांना सौभाग्य प्राप्त होतं आणि त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते.
9) वैद्यनाथ ज्योतिर्लिंग
भारताच्या झारखंड जिल्ह्यातील देवघर येथे स्थित आहे.ज्योतिर्लिंग असल्यासोबतच हे माता सतीच्या शक्तीपीठांपैकी एक आहे. या ठिकाणी मातेच हृदय पडले होते. एवढेच नाही तर या ठिकाणी मातेच्या हृदयात भगवान शंकराचा वास असल्याचेही मानले जाते.
10) नागेश्वर ज्योतिर्लिंग
नागेश्वर ज्योतिर्लिंग महाराष्ट्राच्या जिल्हा अंतर्गत गुजरातच्या द्वारिका धामहून 18 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. महादेवाला नागेश्वरी या नावाने देखील ओळखलं जात होतं. नागेश्वर ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगांपैकी दहाव्या क्रमांकावर आहे.
11) रामेश्वरम ज्योतिर्लिंग
भारताच्या तामिळनाडू राज्याच्या अंतर्गत असलेल्या रामनाथापुरम जिल्ह्यात भगवान शिवला समर्पित एक मंदिर आहे. ह्या मंदिराची स्थापना आपल्या देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी दुसऱ्या क्रमांकावर म्हणजेच अकराव्या क्रमांकावर आहे. तितकाच नाही तर आपल्या भारत देशातील चार धाम यात्रेतही याचा समावेश आहे. हे एक अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे.
12) घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग
घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे आपल्या भारतातील बारावा ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचे ज्योतिर्लिंग आहे. म्हणजे हे ब्रम्ह ज्योतिर्लिंग आहे. भारतातील महाराष्ट्र मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा आणि एलोरा या लेण्याजवळ हे मंदिर स्थित आहे.