Pune News

Narendra Modi : अशक्यप्राय परिवर्तन मोदींनी करुन दाखवलं : शंकर अभ्यंकर

225 0

पुणे : देशात अशक्यप्राय वाटत असलेलं परिवर्तन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करुन दाखवलं असून, प्रभू श्रीरामचंद्रांची प्रजा कल्याणाची भूमिका घेऊन नरेंद्र मोदी देशाचा राज्य कारभार चालवत आहेत, अशी स्पष्ट भूमिका विद्या वाचस्पती गुरुदेव श्री शंकर वासुदेव अभ्यंकर यांनी मांडली आहे. विवेक व्यासपीठ प्रकाशनाच्या माध्यमातून लेखक आणि समरसता विचारक पद्मश्री रमेश पतंगे यांनी लिहिलेल्या ‘दि गेम चेंजर : नरेंद्र मोदी’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी (७ मार्च) त्यांनी आपले मत व्यक्त केले.

लोकमान्य टिळक सभागृह, केसरीवाडा, नारायण पेठ येथे या पुस्तकाचे प्रकाशन झाले. संयोजक कुणाल टिळक यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या वाचस्पती गुरुदेव श्री शंकर वासुदेव अभ्यंकर होते. लेखक पद्मश्री रमेश पतंगे, भाजपाचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर आणि माजी खासदार प्रदीप दादा रावत यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

विद्या वाचस्पती गुरुदेव श्री शंकर वासुदेव अभ्यंकर यावेळी म्हणाले की, “नरेंद्र मोदी हे देशातील आमूलाग्र क्रांतीचे अग्रदूत आहेत. देशात राष्ट्रीय चेतना जागवण्याचे काम संघाने केले, त्याच धर्तीवर नरेंद्र मोदी काम करत आहेत. राष्ट्राचा मुख्य स्वर हा धर्म आहे. पंतप्रधान मोदी देशात हिंदू धर्माला पुनर्स्थापित करत आहेत. त्यामुळे लोकमान्य टिळकांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या जागेवर हा ग्रंथ प्रकाशित होणे, ही खूप भाग्याची गोष्ट आहे.”
ते पुढे म्हणाले की, सुनील देवधर यांनी पुण्यातून त्रिपुरात जावून केलेले कार्य खूप मोठे आहे. अनेक वर्षांच्या डाव्या विचारसरणीच्या गडाला खिंडार पाडण्याचे काम त्यांनी केले असून, त्यांच्यासारखे अभ्यासू, सुसंस्कृत आणि सुज्ञ लोकप्रतिनिधी आपल्या पुण्याला असणे अपेक्षित आहे..

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष कुणाल टिळक यांनी केले. २००४ ते २०१४ या काळात धोरण पक्षघात झालेला भारत, आजच्या घडीला विकसित भारत म्हणून आपल्या समोर उभा आहे. आपल्या सर्वांना मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून पहायचे आहे, अशा भावना यावेळी कुणाल टिळक यांनी व्यक्त केल्या.

“नरेंद्र मोदींना पर्यायाची आवश्यकता नाही, तर विरोधकांना पर्याय उभा करण्याची गरज आहे. कारण एवढी वर्षे सत्तेचा उपभोग घेण्याचं काम काँग्रेसने केलं, परंतु मोदींनी मात्र जनतेसाठी पदाचा उपयोग केला. तसेच गुलामगिरीच्या सावटातून बाहेर पडण्याचे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी साकार करत आहेत.”, अशा भावना यावेळी भाजपाचे नेते सुनील देवधर यांनी व्यक्त केल्या.

“मोदींच्या व्यक्तिमत्त्वाची उकल या पुस्तकातून झालेली असून, नरेंद्र मोदींना समजून घ्यायचे असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समजून घेतला पाहिजे. १० वर्षात भारत अशा टप्प्यावर येऊन पोहोचला आहे की, तो आता विकसनशील राहिलेला नाही तर विकसित राष्ट्र होण्याच्या टप्प्यावर उभा आहे”, असे मत माजी खासदार प्रदीप रावत यांनी व्यक्त केले.

संघाची कार्यशैली समजल्याशिवाय संघ भाजपाचे संबंध लक्षात येत नाहीत! राष्ट्र एका अंगाने विकसित होत नाही, त्यासाठी सर्वांगीण विकास झाला पाहिजे! राजकीय क्षेत्र हे समाजाचे सर्वात महत्त्वाचे अंग असून, ‘राष्ट्र प्रथम’ हा सिद्धांत घेऊनच पंतप्रधान काम करत आहेत. अशा भावना पुस्तकाचे लेखक पद्मश्री रमेश पतंगे यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केल्या. यावेळी शैलेश टिळक यांच्यासह मोठ्या संख्येने पुणेकर पुस्तक प्रेमी नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन अभय थिटे यांनी केले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sudha Murty : सुधा मूर्तींची राज्यसभेवर नियुक्ती; राष्ट्रपतींनी केली घोषणा

Hemangi Kavi : जागतिक महिला दिनानिमित्त हेमांगी कवीने शेअर केली हृदयस्पर्शी पोस्ट

Buldhana Accident : वाहनांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Suicide News : महिला डॉक्टरने महिला दिनादिवशीच इंजेक्शन टोचून संपवले स्वतःचे आयुष्य; धक्कादायक कारण आले समोर

Kedar Shinde : बाईपण भारी देवा नंतर येतोय ‘आईपण भारी देवा’; केदार शिंदेकडून नव्या सिनेमाची घोषणा

Dolly Sohi : ‘हिटलर दीदी’ फेम अभिनेत्री डॉली सोही हिचं निधन

Mahashivratri : महाशिवरात्रीच्या निमिताने जाणून घेऊया भारतातील शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांबद्दल

Women’s Day Special : आज महिला दिनाच्या निमित्त महिलांच्या अधिकारांबद्दल जाणून घेऊया

Virabhadrasana : वीरभद्रासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Related Post

शरद पवारांचा फोन आणि अजित पवारांची पत्रकार परिषद ऐनवेळी रद्द

Posted by - March 13, 2022 0
  उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज पुणे शहराच्या दौऱ्यावर असून तब्बल 31 विकासकामांचं लोकार्पण तसेच भूमिपूजन अजित…

पुणे : बालकामगार प्रथेविरोधी जन जागृती अभियानाची अमंलबजावणी

Posted by - November 15, 2022 0
पुणे : कामगार विभागाच्यावतीने १४ ते २० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत बालकामगार प्रथेविरोधी जन जागृती अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.…
Accident

निशब्द ! हिंजवडीत ट्रकच्या चाकाखाली येऊन तरुणाचा तडफडून मृत्यू

Posted by - August 23, 2023 0
पुणे : पुण्यातील हिंजवडी या ठिकाणी गाड्यांची रेलचाल असते. हा परिसर नेहमी गजबजलेला असतो.या परिसरात आज सकाळी कामावर निघालेल्या तरुणावर…

पुण्याच्या सुधीर ठाकूर यांना ऑस्ट्रेलियाचा ‘सिटिझन ऑफ द इयर’ बहुमान

Posted by - January 26, 2022 0
पुणे- ऑस्ट्रेलियात निराधारांना डबे पोहोचविणाऱ्या संस्थेचे काम करणारे ‘जस्टीस ऑफ पीस’ जबाबदारी सांभाळणारे आणि स्थलांतरितांना इंग्रजी भाषेचे शिक्षण देणारे सुधीर…

नदी सुधार प्रकल्पामुळे मुळा -मुठा नदीची सुमारे १६ फूट पूर पातळी भविष्यात वाढण्याची शक्यता- सारंग यादवाडकर

Posted by - March 19, 2022 0
नदीकाठ सुधार प्रकल्पामुळे मुळा -मुठा नदीची सुमारे १६ फूट पूर पातळी भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *