पुणे : पुणे अग्निशमन दल नियंत्रण कक्षात (Pune Fire) दुपारी 1 वाजता भांडारकर रस्ता, करण सोहेल या सात मजली इमारतीत गच्चीवर पञा व स्लायडिंग अशा बांधकाम असलेल्या ऑफिसमध्ये आग लागल्याची वर्दी मिळाली असता दलाकडून एरंडवणा, कोथरुड येथील वाहन व एक वाॅटर टँकर रवाना करण्यात आला होता. जवान पोहोचताच त्यांनी प्रथम कोणी अडकले नसल्याची खाञी करुन सातव्या मजल्यावर जात होज पाईपच्या साह्याने पाण्याचा मारा सुरू करुन सुमारे वीस मिनिटात आग आटोक्यात आणली व सद्यस्थितीत कुलिंग ऑपरेशन सुरु आहे.
या घटनेत कोणीही जखमी वा जिवितहानी झालेली नाही. तसेच सदर इमारतीचा वापर हा व्यावसायिक असून अनेक ऑफिस आहेत. जवानांनी वेळेत आग विझवत इतरञ पसरु न दिल्याने मोठा धोका टळला आहे. जवानांनी बरयाच कामगारांना या ठिकाणाहून बाहेर काढले. आगीचे कारण सद्यस्थितीत नेमके समजले नाही. सदर आगीवर अग्निशमन प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन अधिकारी राजेश जगताप, गजानन पाथ्रुडकर व जवळपास 20 जवान घटनास्थळी कार्यरत आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Dr Ajay Taware : ब्लड फेरफार प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केलेले डॉ. अजय तावरे नेमके कोण आहेत?
Pune Porsche Car Accident : डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर यांचे निलंबन
HDFC Bank Alert :एचडीएफसी बँकेने UPI व्यवहारांबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Sangli Accident : ‘तो’ वाढदिवस ठरला अखरेचा ! बर्थडे गर्लसह संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत
Crime News : धक्कादायक ! ‘या’ भाजप उमेदवाराच्या ताफ्याने 3 जणांना उडवलं