पुणे : पुण्यामधून (Pune Crime News) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलाचे फोटो मॉर्फ करून अश्लील फोटो सोशल मीडियावर अपलोड करून त्याखाली अश्लील मजकूर लिहून त्या मुलाची बदनामी करण्यात आली. एवढेच नाहीतर त्याच्याकडून 25 हजार रुपये खंडणी उकळून आणखी दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका व्यक्तीवर पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा धक्कादायक प्रकार 14 एप्रिल ते 26 मे या कालावधीत कोंढवा खुर्द येथील आरोपीच्या घराजवळ आणि हॉटेल जश्न जवळ घडला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने फिर्यादी सोबत ओळख करुन मैत्री करुन त्यांचा फोटो मॉर्फ केला. मॉर्फ केलेला अश्लील फोटो ग्रींन्डर अॅप व टेलिग्राम वर अपलोड केला. तसेच अश्लील फोटो फिर्यादीच्या व्हॉट्सअॅपवर पाठवून अश्लील मेसेज केला. आरोपीने फिर्यादी यांचा फोटो मित्रांना पाठवून फिर्यादी ‘गे’ असल्याचे सांगून त्याची बदनामी केली.
यानंतर फिर्यादींनी त्यांना धमकी देऊन 25 हजार रुपये खंडणी उकळली. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्याकडे आणखी दोन लाख रुपये खंडणी मागितली. तसेच ब्लिस बेकरीजवळ व त्याच्या राहत्या घराजवळ बोलावून घेत फिर्यादीला अश्लील स्पर्श करुन आक्षेपार्ह कृत्य करुन मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. यानंतर कोंढवा पोलिसांनी अल्पवयीन तरुणाच्या तक्रारीवरून मोहसिन सय्यद (रा. बोराडे नगर, वानवडी) याच्यावर आयपीसी 384, 506 सह आयटी अॅक्ट 67(ब), पोक्सो कलम 8, 12 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune Fire : पुण्यातील कमला नेहरू पार्क जवळील इमारतीत भीषण आग; अग्निशमन दलाच्या 3 गाड्या दाखल
Dr Ajay Taware : ब्लड फेरफार प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केलेले डॉ. अजय तावरे नेमके कोण आहेत?
Pune Porsche Car Accident : डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर यांचे निलंबन
HDFC Bank Alert :एचडीएफसी बँकेने UPI व्यवहारांबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Sangli Accident : ‘तो’ वाढदिवस ठरला अखरेचा ! बर्थडे गर्लसह संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत
Crime News : धक्कादायक ! ‘या’ भाजप उमेदवाराच्या ताफ्याने 3 जणांना उडवलं