मुंबई : एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी (HDFC Bank Alert) एक मोठी बातमी समोर आली आहे. बँकेने ग्राहकांसाठी नवीन अपडेट जारी केली आहे. आता या बँकेच्या ग्राहकांना ठराविक रकमेपेक्षा कमी UPI व्यवहारांसाठी मजकूर संदेश प्राप्त होणार नाहीत. बँकेच्या या निर्णयाची अंमलबजावणी जुन महिन्याच्या 25 तारखेपासून होणार आहे.
एचडीएफसी बँक 25 जून 2024पासून तुमच्या एसएमएस अलर्ट सेवेत काही बदल करण्यात येणार आहे. जर तुम्ही युपीआयच्या माध्यमातून 100 रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवत आहात. तरच, तुम्हाला एसएमएस अलर्ट पाठवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर, तुम्ही 500 रुपयांपेक्षा जास्त रक्कम प्राप्त करत आहात, तरंच तुम्हाला एसएमएस अलर्ट पाठवण्यात येतील. हे बदल फक्त एसएमएस अलर्टसाठीच असणार आहेत.
आत्तापर्यंत HDFC बँकेकडून ग्राहकांना प्रत्येक व्यवहारावर SMS पाठवते. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही कोणतेही पेमेंट करता किंवा तुमच्या खात्यात कुठूनतरी पैसे प्राप्त करता तेव्हा तुम्हाला त्याबद्दल लगेच एसएमएस येतो. हा व्यवहार 10 रुपयांचा असला पूर्वी एसएमएस येत होते. मात्र आता ही प्रणाली बंद होणार असून पुढील महिन्यापासून नवीन प्रणाली लागू होणार आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Sangli Accident : ‘तो’ वाढदिवस ठरला अखरेचा ! बर्थडे गर्लसह संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत
Crime News : धक्कादायक ! ‘या’ भाजप उमेदवाराच्या ताफ्याने 3 जणांना उडवलं