गडकिल्ले, पर्यटनस्थळ परिसरात १७ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

271 0

पुणे : हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच अपघाताचा संभाव्य धोका लक्षात घेता फौजदारी दंड संहितेच्या कलम १४४ नुसार जिल्ह्यातील गडकिल्ले, धरण, तलाव , धबधबे आदी पर्यटनस्थळ परिसरात जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी १७ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.                        हवेली तालुक्यातील सिंहगड किल्ला, आतकरवाडी ते सिंहगड ट्रेक, मावळ तालुक्यातील किल्ले लोहगड, किल्ले विसापूर, किल्ले तिकोणा, किल्ले तुंग, ड्युक्स नोज, भाजे लेणी, भाजे धबधबा, दुधीवरे खिंड, पवना परिसर, राजमाची ट्रेक, किल्ले कातळदरा धबधबा, कोंढेश्वर ते ढाकबेहरी किल्ला, एकविरा लेणी परिसर, मुळशी तालुक्यातील अंधारबन ट्रेक, प्लस व्हॅली, कुंडलिका व्हॅली, दिपदरा, कोराईगड, भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ला, वेल्हा तालुक्यातील किल्ले राजगड, किल्ले तोरणा, पाणशेत धरण परिसर, मढेघाट, जुन्नर तालक्यातील किल्ले जीवधन, आंबेगाव तालुक्यातील बलीवरे ते पदरवाडी, भिमाशंकर ट्रेक (बैलघाट, शिडीघाट, गणवतीमार्गे) या ठिकाणी असलेले किल्ले, धबधबे, तलाव किंवा धरण या ठिकाणांच्या सभोवताली एक किलोमीटर परिसरात १७ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहेत.                                                                                                                                                                                                        या ठिकाणी वाढते अपघाताचे प्रमाण लक्षात घेत व अपघाताचा संभाव्य धोका टाळण्यासाठी फौजदारी दंड संहितेचे कलम १४४ लागू करण्यासंदर्भात वन विभागानेही शिफारस केली आहे.

असे असतील प्रतिबंध
1.पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी वरील नमूद ठिकाणी एकत्र येण्यावर प्रतिबंध राहील. पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे, धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी काढणे व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

2. पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरात मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्यवाहतूक करणे, अनाधिकृत मद्य विक्री करणे व उघडयावर मद्य सेवन करणे, वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे, वाहनांची ने आण करताना बेदरकारपणे वाहन चालवणे तसेच धोकादायक स्थितीत वाहन ओव्हरटेक करणे या बाबींना प्रतिबंध करण्यात आला आहे.

3. सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या व थरमाकॉलचे व प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर व इतरत्र फेकणे, मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, डिजे सिस्टीम वाजविणे व त्यामुळे ध्वनीप्रदुषण करणे, ध्वनी, वायु व जल प्रदुषण होईल अशी कोणतीही कृती करणे यासही प्रतिबंध राहील. धबधब्याच्या एक किलोमीटर परिसरात अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून सर्व दुचाकी, तीनचाकी, चारचाकी व सहा चाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई जाहीर करण्यात आली आहे.

आदेशाचे उल्लघंन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

#CNG : तुम्ही CNG वाहन चालवता का ? मग ही बातमी वाचाच ! पुण्यातील सीएनजी पंप राहणार आहेत बेमुदत बंद

Posted by - January 24, 2023 0
पुणे : पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले असतानाच सध्या इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. पण तुम्ही देखील…

Pune Porsche Car Accident : पुणे अपघात प्रकरणी ‘त्या’ दोघांविरोधात सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल

Posted by - May 25, 2024 0
पुणे : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात (Pune Porsche Car Accident) अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या वडिलांना अटक केल्यानंतर आता या…

इन्फ्लुएंझाची लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार करून घ्यावेत; सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे आवाहन

Posted by - March 16, 2023 0
मुंबई : राज्यात इन्फलुएंझा आजाराबाबत सतर्क राहण्याच्या सूचना सर्व जिल्हयातील आरोग्य यंत्रणांना देण्यात आलेल्या असून राज्यस्तरावरून नियमितपणे सनियंत्रण करण्यात येत…

काय सांगता! आता फक्त 99 रुपयांत मिळणार दारू, अधिसूचना जारी

Posted by - October 2, 2024 0
मद्यप्रेमींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली असून आता अवघ्या 99 रुपयात कोणतीही तारू मिळणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *