गुरुपौर्णिमेनिमित्त पुण्यातील आश्रमात ओशो अनुयायांना प्रवेश नाकारला; अनुयायांचं आंदोलन

228 0

पुणे: गुरुपौर्णिमेनिमित्त समाधीच्या दर्शनासाठी देशातील विविध ठिकाणांहून आलेल्या ओशो अनुयायांना आश्रमात प्रवेश करण्यास मनाई केल्याबद्दल पुण्यातील कोरेगाव पार्क येथील आश्रमाबाहेर बुधवारी आंदोलन करण्यात आलं. ओशोंचे विचार संपवण्याचं विदेशी लोकांचं षडयंत्र असल्याचा आरोप यावेळी पत्रकार परिषदेत करण्यात आला.

“ओशो यांचा जन्म व मृत्यू स्थळ तसेच समाधी भारतात आहे मात्र ओशोंची बौद्धिक संपदा, पुस्तके, ध्वनिफिती, दृकश्राव्य फिती, ट्रस्टची मालमत्ता या सर्वांचे मान्यता अधिकार पाश्चिमात्यांकडे आहेत. झुरीच येथे ओशो इंटरनॅशनलचं मुख्यालय नेण्यात आलं असून सगळ्या गोष्टींचा लाभही तिथंच जात आहे. ओशोंचे विचार लोकांपर्यंत पोचू न देता अनुयायांवरही अनेक बंधनं लादण्यात येत आहेत. ओशोंच्या बौद्धिक संपदेवर हक्क सांगत त्या साहित्यातून मिळणारा संपूर्ण पैसा पाश्चिमात्यांकडेच जातोय. भारतीय ओशो आश्रमांना विशेषतः पुण्यातील आश्रमास त्यातून काहीही उत्पन्न मिळत नाही. उलट ते येथील व्यवस्थापनावरही आपलं वर्चस्व दाखवत आहेत. हा तर आश्रमाच्या मालमत्ता विकण्याचा प्रयत्न असून हे सर्व ओशोंचे विचार संपवण्याचं षडयंत्र आहे,” असा आरोप ओशो अनुयायांच्या वतीनं ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनचे माजी विश्वस्त तसेच ‘ओशो वर्ल्ड’ पत्रिकेचे संपादक स्वामी चैतन्य कीर्ती यांनी केला. या पत्रकार परिषदेस स्वामी चैतन्य कीर्ती यांच्यासह पटकथाकार व ओशो अनुयायी कमलेश पांडे, याचिकाकर्ते व माजी विश्वस्त स्वामी प्रेमगीतजी अर्थात योगेश ठक्कर, स्वामी मोक्षजी, स्वामी चेतनारूपजी आदी अनुयायी उपस्थित होते.

माळा घालू नयेत या बंधनाचा आग्रह धरत आज माळधारक अनुयायींना समाधीचं दर्शन घेऊ देण्यात आलं नाही. दर्शन घ्यायचं असेल तर माळ काढावी लागेल, अशी सक्ती करण्यात आल्याचंही अनुयायींनी सांगितलं. आत प्रवेश नाकारल्यानं आश्रमाच्या प्रवेशद्वाराबाहेर अनुयायांनी भर पावसात चार तास आंदोलन केलं.

आधीच ओशो आश्रमाची जागा विकण्यावरून वाद सुरू असताना ओशोंची माळ न घालण्यासाठी अनुयायांवर घालण्यात आलेली बंधनं, ओशो साहित्याचे अधिकार आदी विषय देखील आता चव्हाट्यावर आले आहेत.

Share This News

Related Post

#Digital Media : पुण्यातील डिजिटल मीडियाला कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक वार्तांकनासाठी पासेस नाकारले; डिजिटल मीडियामध्ये नाराजी

Posted by - February 8, 2023 0
पुणे : सध्या पुण्यामध्ये कसबा आणि चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच मीडिया प्रतिनिधी या निवडणुकीची प्रत्येक अपडेट…

#PUNE : कर्तव्यावर असताना पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Posted by - February 4, 2023 0
पुणे : सेनापती बापट चौक जंक्शन येथे कर्तव्य बजावत असताना पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन…

कमला सिटी सोसायटीच्या अध्यक्षपदी सुभाष बोडके तर सचिवपदी विश्वास रिसबूड

Posted by - March 29, 2022 0
पुणे- कात्रज येथील कमला सिटी गृहरचना संस्था मर्यादित या संस्थेच्या कार्यकारिणीची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळीं संस्थेच्या अध्यक्षपदी सुभाष…
Dagdushet Ganpati

Dagdusheth Ganpati : गणपती बाप्पा मोरया !श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना पहा टॉप न्यूज मराठीवर LIVE

Posted by - September 19, 2023 0
पुणे : ज्या लाडक्या बाप्पाची आपण वर्षभरापासून आतुरतेने वाट बघत असतो. तो बाप्पा आज विराजमान होत आहे. यंदाचा बाप्पाचा आगमन…

पुणे मार्केटयार्डातील आवारात चोरट्यांचा उच्छाद; कांदा, बटाटा, फळांची चोरी

Posted by - March 15, 2022 0
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटयार्डातील बाजार आवारात चोरट्यांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय. याठिकाणी शेतमालाच्या चोरीच्या घटना सर्रास घडत असून त्याकडे मात्र…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *