Breaking News

महाभारत मालिकेत भीमाची भूमिका साकारणारे प्रवीण कुमार यांचे निधन

416 0

बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेत काम करणारे अभिनेते प्रवीण कुमार सोबती (वय ७४) यांचे निधन झाले आहे. प्रवीण यांच्या निधनानंतर कलाविश्वात शोक व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. तसेच त्यांच्यावर आर्थिक संकटही कोसळले होते.

गेल्या काही महिन्यांपासून पाठदुखीच्या आजारामुळे त्रस्त होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. अभिनयाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी प्रवीण कुमार अॅथलिट होते.. त्यांनी आशियाई खेळामध्ये दोन सूवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावलं होतं.. यासोबतच 1968 आणि 1972 च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधत्वही केलं होतं.

बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेत भीमाच्या लोकप्रियता मिळवून दिली. त्यांची ही भूमिका खूप गाजली. त्यांच्या निधनामुळे कला विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!