Supriya Sule

युपी, बिहारींना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी केंद्र सरकारनेच ट्रेन सुरू केल्या, सुप्रिया सुळे यांचा घणाघात

110 0

नवी दिल्ली- महाराष्ट्र काँग्रेसने कोरोनाच्या पहिल्या लाटेत मुंबईतील उत्तर भारतीयांना मोफत रेल्वे तिकीटे दिली आणि त्यामुळे कोरोना उत्तरप्रदेश, बिहार, उत्तराखंडमध्ये पसरला असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत केलं. या वक्तव्यावरून विरोधी पक्षांनी आता नरेंद्र मोदी यांच्यावर पलटवार केला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार आक्षेप घेत युपी, बिहारींना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी केंद्र सरकारनेच ट्रेन सुरू केल्या होत्या. आम्ही केवळ त्यांच्या तिकीटाचे पैसे दिले असे म्हटले आहे.

सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काल भाषण झालं. खूप अपेक्षेने मी त्या भाषणाकडे पाहत होती कारण, फार अडचणीच्या काळात आपला देश चालला आहे. महामारीतून आपण बाहेर पडत आहोत. कोविडची तिसरी लाट आता ओसरत आहे. चीनचा मुद्दा आहे. नोकरीचा मुद्दा आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या भाषणाकडे फार अपेक्षेने पाहत होतो. पण दुर्दैवं असं की, आपल्या महाराष्ट्राबद्दल पंतप्रधान जे बोलले त्याबद्दल मला प्रचंड वेदना झाल्या. ज्या राज्याने 18 खासदार भाजपला निवडून दिले, नरेंद्र मोदी आज पंतप्रधान आहेत त्यात सिंहाचा वाटा महाराष्ट्राचाही आहे. त्याच महाराष्ट्राचा उल्लेख पंतप्रधानांनी कोरोनाचा सुपरस्प्रेडर म्हणून केला, हे खूपच धक्कादायक आहे.

श्रमिक ट्रेन्सचा दाखला देत सुप्रिया सुळेंनी कुठल्या राज्यातून किती ट्रेन्स गेल्या याची माहिती दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, ट्रेन्स महाराष्ट्र सरकार देत नाही तर केंद्र सरकार चालवतं. गुजरातमधून 1033 ट्रेन्स, महाराष्ट्रातून 817, पंजाबमधून 400 श्रमिक ट्रेन्स गेल्या. केंद्र सरकार ठरवतं कुठली ट्रेन कुठून आणि किती वाजता जाणार. त्यामुळे पंतप्रधानांनी महाराष्ट्राबद्दल जे म्हटलं त्यामुळे मला प्रचंड वेदना होत आहेत.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी कोरोना काळात ट्रेन सुरू करण्यात येत असल्याचे तत्कालीन रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी केलेले पाच ट्विट आणि ट्रेन सुरू केल्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोयल यांचे आभार मानणारे केलेलं ट्विट दाखवून त्यांनी भाजपचा पर्दाफाश केला.

राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अचानक लॅाकडाऊन लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मजुरांना वाऱ्यावर सोडलं होतं. त्याच मजुरांना महाराष्ट्र काँग्रेसने घरी सोडलं असं म्हणत मोदी यांच्यावर टीका केली आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यात भाजप पराभवाच्या छायेत आहेत. त्यामुळं आपलं पाप केंद्र सरकार दुसऱ्यावर ढकलत आहेत असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहे. ट्रम्प यांचा कार्यक्रम करुन यांनी देशात कोरोना पसरवला. आणि हे थाळ्या वाजवत राहिले. आम्ही सेवा केली, असंही वडेट्टीवार म्हणाले.

Share This News

Related Post

Breaking ! मंत्री उदय सामंत यांच्या बोटीला अपघात, सर्वजण सुखरूप

Posted by - April 3, 2023 0
महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या बोटीला अलिबाग जवळील मांडवा येथे अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांना श्रद्धांजली; मनामनात लावणीचे लावण्य पोहचवणारी सूरसम्राज्ञी

Posted by - December 10, 2022 0
मुंबई : “मराठी लोककलेचं लावण्य असणाऱ्या लावणीला घराघरांत आणि मनामनात पोहचवणाऱ्या सूरसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या लावणीची ओळख सांगणारा…

दिल्लीत भीषण आग, सात जणांचा होरपळून मृत्यू, 30 झोपड्या जळून खाक

Posted by - March 12, 2022 0
नवी दिल्ली- दिल्लीतील गोकुळपुरी भागातील झोपडपट्टीला लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी-शनिवारी रात्री उशिरा आग लागल्याचे वृत्त…

रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने संविधान दिन साजरा! संविधानाच्या 1000 प्रतींचे वाटप

Posted by - November 26, 2022 0
पुणे : 26 नोव्हेंबर हा भारतीय स्वातंत्र्य दिन, देशात मोठ्या आनंदात उत्साहात साजरा होत असताना रुग्ण हक्क परिषद पुणे शहर…

कसबा चिंचवडची पोटनिवडणूक मनसे लढवणार?

Posted by - January 29, 2023 0
पुणे: भाजपाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानं रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *