अपहरण झाल्याचे भासवून एक लाख रुपयांसाठी आईनेच पोटच्या मुलाला विकले (व्हिडिओ)

586 0

पुणे- अपहरण झाल्याचे भासवून पोटच्या मुलाला आईनेच एक लाख रुपयांसाठी विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील कोथरूड परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी २४ तासात गुन्ह्याचा उलगडा करून आईसह ८ जणांना अटक केली आहे.

जन्नत बशीर शेख, रेश्मा सुतार, प्रियांका गणेश पवार, तुकाराम निंबळे, चंद्रकला माळी, भानुदास माळी, दीपक तुकाराम म्हात्रे, सीताबाई दीपक म्हात्रे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत

याबाबतची माहिती अशी की, पुण्यातील कोथरूड परिसरातून आपल्या चार वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार आई प्रियांका गणेश पवार हिने दिली होती. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून घेतला. या प्रकरणाचा तपास कोथरूड, वारजे, उत्तमनगर पोलिसांच्या ९ पथकाकडून सुरु होता.

दरम्यान, या घटनेचा तपास सुरु असताना अपहरण झालेला मुलगा त्याच दिवशी बांगडीवाली भाभी उर्फ जन्नत बशीर शेख या महिलेसोबत होता, अशी माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन तपास सुरु केला. तिची कसून चौकशी केली. सुरुवातीला त्या महिलेनं उडवाउडवीची उत्तरे दिली. पण पोलिसी खाक्या दाखवताच तिची बोबडी वळली आणि तिने गुन्हा कबूल केला. ही चौकशी सुरु असताना दुसऱ्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये एक महिला मुलाला घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले.

जन्नत शेख हिने स्थानिक महिला रेश्मा सुतार आणि अपहृत मुलाची आई प्रियांका गणेश पवार यांच्याशी संगनमत करून आरोपी तुकाराम निंबळे यांच्या मध्यस्थीने पीडित मुलाला बोर्लेगाव पनवेल येथील चंद्रकला माळी, भानुदास माळी यांना १ लाख रुपयांना विकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी त्वरित पनवेल येथून दोघा आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अपहृत मुलांबाबत चौकशी केली असता अपहृत मुलाला त्यांनी केळवणे, पनवेल येथील दीपक म्हात्रे, सीताबाई म्हात्रे यांना या मुलाला १ लाख ६० हजार रुपयांना विकल्याचे सांगितले. पोलिसांनी केळवणे येथे जाऊन आरोपी आणि अपहृत मुलाला ताब्यात घेतले.

तपासा दरम्यान घटस्फोटानंतर मुलांना सांभाळणे शक्य नसल्याने मुलाची विक्री केल्याची माहिती आरोपीने दिली आहे. पोलीस या घटनेचा आणखी तपास करत आहेत. अपहरण झालेल्या मुलाची सुटका करून पोलिसांनी त्याला वडील गणेश पवार याच्या ताब्यात दिले आहे.

Share This News

Related Post

Pune Accident News

Pune Accident News : गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पुण्यतील डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - November 20, 2023 0
पुणे : पुण्यातील (Pune Accident News) मावळ मधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मावळमधील चांदखेड येथे ओढ्यामध्ये कारवरील नियंत्रण…

पुणे : रिक्षा संपमुळे शालेय विद्यार्थी आणि पालकांची तारांबळ

Posted by - November 28, 2022 0
पुणे : बेकायदा बाईक-टॅक्सी प्रवासी वाहतूक करणा-यांच्या विरोधात परीक्षा संघटनांनी बेमुदत बंद पुकारला आहे. आज पुणे आरटीओ कार्यालयासमोर मोठे आंदोलन…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खेडमध्ये दाखल; थोड्याच वेळात जाहीर सभेला करणार संबोधित

Posted by - March 19, 2023 0
रत्नागिरी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज खेडमध्ये जाहीर सभा होत असून सभास्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ…

Breaking ! नाशिकच्या सिक्युरिटी नोट प्रेसच्या आवारात आग

Posted by - March 31, 2022 0
नाशिक- चलनी नोटांची निर्मिती करणाऱ्या नाशिकच्या सिक्युरिटी नोट प्रेसच्या आवारात अचानक मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. नोट प्रेसच्या मागील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *