औरंगाबाद: औरंगाबाद-पुणे या 268 किलोमीटरच्या विशेष महामार्गाचं काम सुरू होणार असून लवकरच सहा पदरी रस्ता सुरू होईल आणि त्याला पुणे, बंगळुरू व अहमदनगर ही शहरं जोडली जातील.
या विशेष महामार्गामुळं पुणे-औरंगाबाद अंतर अवघ्या अडीच तासांमध्ये गाठणं शक्य होईल, असं केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितलं.
औरंगाबाद पुणे २६८ किलोमिटर विशेष महामार्ग काम सुरू होणार असून या सहा पदरी रस्त्याला पुणे बंगलोर, नगर जोडले जाईल. पुणे औरंगाबाद अडीच तासांमध्ये गाठणे शक्य होईल.औरंगाबाद जळगाव रस्त्याच्या कामात अडचणी होत्या, मार्च महिन्यापर्यंत रस्ता पूर्ण होईल. औरंगाबाद वाळूज रस्त्यावर डबल डेकर पुल तयार होईल. जुन्या पुलांचा अभ्यास करू, अतिक्रमण काढू असे गडकरी यावेळेस म्हणाले.